सोयाबीन तेलाचे दर वाढतेच...

देशात खाद्यतेलांच्या दरात झालेल्या वाढीमुळे सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आयातशुल्कात कपात करून खाद्यतेल आयातीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. मात्र सोयाबीन तेलाचा विचार करता २७ सप्टेंबर २०२० रोजी प्रतिकिलो ९९.३६ रुपये घाऊक दर होता.
Soybean oil prices continue to rise ...
Soybean oil prices continue to rise ...

पुणे : देशात खाद्यतेलांच्या दरात झालेल्या वाढीमुळे सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आयातशुल्कात कपात करून खाद्यतेल आयातीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. मात्र सोयाबीन तेलाचा विचार करता २७ सप्टेंबर २०२० रोजी प्रतिकिलो ९९.३६ रुपये घाऊक दर होता. आयातशुल्क कपातीनंतर २७ सप्टेंबर २०२१ ला हा दर १५५.८० रुपये होता. तर २७ ऑगस्ट २०२१ ला १५४.३६ रुपये होता. खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन तेलाचे दर कमी झाले नाहीत, मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे दर बाजारात कमी होण्यास मदत झाली.    

इतर तेलांच्या घाऊक दरांचा विचार करता, २७ सप्टेंबर २०२० रोजी भुईमूग तेलाचे दर प्रतिकिलो १४७.३५ रुपयांवरून आता १८०.७६ रुपयांवर पोहोचले आहेत. मोहरी तेलाचे दर १२४.१८ रुपयांवरून १८१.८४ रुपये, सूर्यफूल तेल ११६.८२ रुपयांवरून १७०.७० रुपये, पामतेलाचे दर ९२.२१ रुपयांवरून १३२.३२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

गेल्या महिन्यात, २७ ऑगस्ट २०२१ रोजी खाद्यतेलांच्या घाऊक दरांचा विचार करता शेंगदाणा तेल १७९.३७ रुपये प्रतिकिलो होते. मोहरी तेल १७३.०२ रुपये, वनस्पती तूप १३५.४३ रुपये, सोयाबीन तेल १५४.३६ रुपये, सूर्यफूल तेल १७१.६५ रुपये आणि पामतेल १३२.२६ रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते.केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत तेलाचे किरकोळ दर २७ सप्टेंबर २०२० रोजी सोयाबीन तेलाचे दर १२१ रुपये प्रतिकिलो होते. ते २७ सप्टेंबर २०२१ रोजी १५७ रुपये किलोपर्यंत पोहोचले. शेंगदाणे तेल १८४ रुपयांवरून १८८ रुपये, मोहरीतेल १४२ रुपयांवरून २०१ रुपयांवर पोहोचले, सूर्यफूल तेलाचे दर १४० रुपयांवरून १८६ रुपयांवर, तर पामतेलाचे दर १०६ रुपयांवरून वाढत १३२ रुपयांवर पोहोचले.  

खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करा  सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात केल्यानंतरही दर कमी होत नाहीत. मात्र त्याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. खरिपातील तेलबिया काढणीच्या मुख्य हंगामात ही कपात केल्याने शेतकरी तेलबिया लागवडीपासून परावृत्त होण्याची भीती आहे. तसेच गुजरातमध्ये भुईमूग आणि कपाशीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तेल आयातीला प्रोत्साहन न देता आयातशुल्कात कपात करावी. तसेच पामोलिन तेलाला आयातीच्या मुक्त सूचितून काढावे, अशी मागणी गुजरातमधील ऑइल मिलर्सनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com