Agriculture news in marathi soybean oil stocks seized on suspicion of adulteration | Agrowon

भेसळीच्या संशयावरून १९ लाखांचा सोयाबीन तेलसाठा जप्त 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील खाद्यतेल विक्रेते, मिठाई व खवा विक्रेत्यावर धाडी घालून अन्न व औषध प्रशासन विभागाने १९ लाख २२ हजार ४२९ रुपये किमतीच्या सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला आहे.

भंडारा  : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील खाद्यतेल विक्रेते, मिठाई व खवा विक्रेत्यावर धाडी घालून अन्न व औषध प्रशासन विभागाने १९ लाख २२ हजार ४२९ रुपये किमतीच्या सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला आहे. अन्य विक्रेत्यावरही या मोहिमेत कारवाई करण्यात आली. 

दिवाळी सणानिमित्त खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन, भंडारा व गोंदिया कार्यालयातर्फे विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. खाद्य तेल रिपॅक करणारे विक्रेते, मिठाई, खवा विक्रेत्यांवर छापे टाकून सहा खाद्यतेल रिपॅकर्स पेढ्यांकडून एकूण किलो १७ हजार ५२३.८ रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत १९ लाख २२ हजार ४२९ रुपये इतकी आहे.

में. गुरुनानक आईल मिल, माताटोली रोड ,गोंदिया. मे. भगत कंवरराम ऑइल इंडस्ट्रीज, पिंडकेपार रोड, गोंदिया. मे. शीव ऑइल मिल, मुर्री रोड, गोंदिया. मे. गुरुनानक तेल भांडार, गौशाला बार्ड, गोंदिया. में. के. जी . एन . ट्रेडर्स, लाखनी, जि. भंडारा. मे. ए. वाय. ऑइल पॅकर्स, मेन रोड, गडेगाव, ता. लाखनी, जि. भंडारा. यांच्याकडून खाद्य तेल रिपॅक करण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या टिनांच्या डब्यांचा पुर्नवापर होत असल्याने अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या तरतुदी अंतर्गत जन स्वास्थ, सुरक्षेच्या कारणास्तव खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच लाखनी, जि. भंडारा येथील दोन खाद्य तेल रिपॅकर्सकडे कायद्याच्या तरतुदी अंतर्गत स्वत: ची स्वतंत्र व सुसज्ज प्रयोगशाळा नसल्याने सदर पेढ्यांना प्रयोगशाळा स्थापन करेपर्यंत खाद्य तेलाची विक्री तत्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

में. सदगुरू अनाज भंडार, दुर्गा चौक गोंदिया या पेढीतून भेसळीच्या संशयावरून एकूण ६ हजार ८६० किमतीची ९८ किलो वटाणा पावडरचा साठा जप्त करण्यात आला आहे. मे. बावनथडे खोवा विक्री केंद्र, रामनगर, गोंदिया येथे एकूण किंमत २० हजार ७२० रुपये किमतीचे १४८ किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात विशेष मोहिमे अंतर्गत एकूण ४९ विविध अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले. त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न औषधी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...