सोयाबीन पाच हजारांवर

उत्पादनात घट, वाढलेली मागणी आणि चांगली निर्यात यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीन यंदा तेजीत आहे. मंगळवारी (ता. ९) सोयाबीनचे प्लॅंट दर हे पाच हजारांवर पोचले.
soybean
soybean

पुणे ः उत्पादनात घट, वाढलेली मागणी आणि चांगली निर्यात यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीन यंदा तेजीत आहे. मंगळवारी (ता. ९) सोयाबीनचे प्लॅंट दर हे पाच हजारांवर पोचले. सांगली येथील प्लॅंट दर ५०००, लातूर येथील दर ४९५०, तर मध्य प्रदेशात सरासरी ४९८० रुपये दर होते. उत्पादनात घट आणि सोयामिलची मोठ्या निर्यातीचे संकेत यामुळे दर यंदा विक्रमी टप्पा गाठतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  देशात यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी घट पाहायला मिळाली. त्यासोबत जागतिक उत्पादनातही घट झाली. ब्राझील, अमेरिका या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक देशांमध्ये पिकाला फटका बसला. परिणामी, मागणीच्या तुलनेत बाजारात सोयाबीनचा पुरवठा होताना दिसत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन मागील साडेसहा वर्षांच्या विक्रमी पातळीवर आहे. उत्पादनातील घट आणि बहुतेक देशांची आक्रमक खरेदी यामुळे दराला तडका बसत आहे. पुढील काळात भारतीय सोयाबीनचे दर आणखी वाढतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  बाजारात दर हे प्लॅंट दराच्या साधारण १५० ते २०० रुपयांनी कमी राहतात. शुक्रवारी राज्यातील अनेक बाजारांत सोयाबीन ४५५० ते ४७५० या दराने विकले गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे केवळ १० ते १५ टक्क्यांपर्यंत सोयाबीन शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांकडील बहुतेक सोयाबीन हे पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून वापारासाठी ठेवलेले आहे. त्यामुळे ते बाजारात येण्याची खूपच कमी शक्यता आहे.

सोयामिल निर्यातही वाढली भारतीय सोयामिलला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. यंदा जागतिक सोयाबीन उत्पादनातच घट असल्याने आणि मागील मालाचा साठा अत्यंत कमी असल्याने सोयामिल निर्यात वाढल्याने सोयाबीनची मागणी वाढली आहे. २०२०-२१ मध्ये भारतीय सोयामिलची २० लाख टन निर्यात होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ८ लाख टन निर्यात झाली होती.

तेजीसाठी कारणीभूत घटक

  • अमेरिकेच्या सोयामिलचा कमी पुरवठा आणि चीन आक्रमक मागणी
  • या आठवड्यात अमेरिकेच्या सोयामिल फिचर्स साडेसहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर
  • भारतीय सोयामिलची निर्यात २० लाख टनांवर होण्याची शक्यता
  • देशात नवीन सोयाबीनचा ऑक्टोबर २०२१ म्हणजेच आठ महिने पुरवठा होणार नाही
  • बर्ड फ्लूची भीती पुढील काही दिवसांत संपून स्थानिक मागणी वाढण्याचे संकेत
  • ‘सीबॉट’ने पुन्हा ओलांडली १४०० डॉलरची पातळी
  • सर्व घटक सोयाबीन दरवाढीला कारणीभूत
  • प्रतिक्रिया मागणी आणि पुरवठ्याच्या असंतुलनामुळे सध्या सोयाबीन दरात तेजीचा कल आहे. येणाऱ्या महिनाभरात सोयाबीन दरात २५० ते ३०० रुपायांची वाढ होण्याचा अंदाज आहे. सोयाबीनमधील तेजीचा कल कायम राहील.  - दिनेश सोमाणी,  शेतीमाल बाजार विश्‍लेषक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com