agriculture news in Marathi Soybean plant rate reached at five thousand Maharashtra | Page 4 ||| Agrowon

सोयाबीन पाच हजारांवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

उत्पादनात घट, वाढलेली मागणी आणि चांगली निर्यात यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीन यंदा तेजीत आहे. मंगळवारी (ता. ९) सोयाबीनचे प्लॅंट दर हे पाच हजारांवर पोचले. 

पुणे ः उत्पादनात घट, वाढलेली मागणी आणि चांगली निर्यात यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीन यंदा तेजीत आहे. मंगळवारी (ता. ९) सोयाबीनचे प्लॅंट दर हे पाच हजारांवर पोचले. सांगली येथील प्लॅंट दर ५०००, लातूर येथील दर ४९५०, तर मध्य प्रदेशात सरासरी ४९८० रुपये दर होते. उत्पादनात घट आणि सोयामिलची मोठ्या निर्यातीचे संकेत यामुळे दर यंदा विक्रमी टप्पा गाठतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

देशात यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी घट पाहायला मिळाली. त्यासोबत जागतिक उत्पादनातही घट झाली. ब्राझील, अमेरिका या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक देशांमध्ये पिकाला फटका बसला. परिणामी, मागणीच्या तुलनेत बाजारात सोयाबीनचा पुरवठा होताना दिसत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन मागील साडेसहा वर्षांच्या विक्रमी पातळीवर आहे. उत्पादनातील घट आणि बहुतेक देशांची आक्रमक खरेदी यामुळे दराला तडका बसत आहे. पुढील काळात भारतीय सोयाबीनचे दर आणखी वाढतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

बाजारात दर हे प्लॅंट दराच्या साधारण १५० ते २०० रुपयांनी कमी राहतात. शुक्रवारी राज्यातील अनेक बाजारांत सोयाबीन ४५५० ते ४७५० या दराने विकले गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे केवळ १० ते १५ टक्क्यांपर्यंत सोयाबीन शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांकडील बहुतेक सोयाबीन हे पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून वापारासाठी ठेवलेले आहे. त्यामुळे ते बाजारात येण्याची खूपच कमी शक्यता आहे.

सोयामिल निर्यातही वाढली
भारतीय सोयामिलला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. यंदा जागतिक सोयाबीन उत्पादनातच घट असल्याने आणि मागील मालाचा साठा अत्यंत कमी असल्याने सोयामिल निर्यात वाढल्याने सोयाबीनची मागणी वाढली आहे. २०२०-२१ मध्ये भारतीय सोयामिलची २० लाख टन निर्यात होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ८ लाख टन निर्यात झाली होती.

तेजीसाठी कारणीभूत घटक

  • अमेरिकेच्या सोयामिलचा कमी पुरवठा आणि चीन आक्रमक मागणी
  • या आठवड्यात अमेरिकेच्या सोयामिल फिचर्स साडेसहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर
  • भारतीय सोयामिलची निर्यात २० लाख टनांवर होण्याची शक्यता
  • देशात नवीन सोयाबीनचा ऑक्टोबर २०२१ म्हणजेच आठ महिने पुरवठा होणार नाही
  • बर्ड फ्लूची भीती पुढील काही दिवसांत संपून स्थानिक मागणी वाढण्याचे संकेत
  • ‘सीबॉट’ने पुन्हा ओलांडली १४०० डॉलरची पातळी
  • सर्व घटक सोयाबीन दरवाढीला कारणीभूत

प्रतिक्रिया
मागणी आणि पुरवठ्याच्या असंतुलनामुळे सध्या सोयाबीन दरात तेजीचा कल आहे. येणाऱ्या महिनाभरात सोयाबीन दरात २५० ते ३०० रुपायांची वाढ होण्याचा अंदाज आहे. सोयाबीनमधील तेजीचा कल कायम राहील. 
- दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्‍लेषक


इतर अॅग्रोमनी
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...