सोयाबीन बियाणे प्लॉटना फटका

सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान पाहता पुढच्या खरिपात सोयाबीन बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
soybean loss
soybean loss

औरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान पाहता पुढच्या खरिपात सोयाबीन बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. काढणीला आलेले सोयाबीन पावसात भिजून बियाणे प्लॉट धोक्यात येण्याची शक्यता गृहीत धरून यावर्षीचे बियाणे जतन करून ते पुढच्या वर्षी वापरण्यास उद्युक्त करण्याची मोहीम कृषी विभागाने हाती घेतली आहे. मोठ्या प्रमाणात क्षेत्र असलेल्या जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसाने खरिपातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या पेरणीसाठी यावेळच्या खरिपातील किती सोयाबीन बियाणे म्हणून उपयोगी पडू शकेल यावरही पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे उपलब्धतेचे गणित अवलंबून असणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तुलनेने कमी क्षेत्र सोयाबीनखाली आहे. जिल्ह्यात यंदा फक्त १३ हजार हेक्टरवर सोयाबीन घेतले आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी तुरळक दिसणारे सोयाबीन सोयगाव तालुक्यातील सावलदबारा परिसरातील सात ते आठ गावांमध्ये सलग दिसते. कृषी विभागाने सोयगाव तालुक्यातील सावळदबारा, नांदगाव येथे क्षेत्रीय पाहणी करून, शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन घरचे बियाणे राखून ठेवणे किती आवश्यक आहे, बियाणे राखून ठेवताना काढणीच्या अगोदर, काढणी वेळी, काढणी नंतर, साठवणूक वेळी कशी काळजी घ्यायची, बियाणे घरचे वापरल्यामुळे उत्पादन खर्च कसा कमी होतो हे समजून सांगितले. त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवण्यास होकार दिला.

नवीन वाणाचे प्रात्यक्षिक औरंगाबाद जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांकडे सोयाबीनच्या जे एस ३३५ याच वाणाची पेरणी होते. नवीन वाणाचा प्रसार करण्यासाठी या वर्षी एम ए यू एस १५८ व १६२ या वाणाचे बियाणे प्रात्यक्षिकासाठी देण्यात आले. नांदगाव येथे या बियाण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. या बियाण्यातून जवळपास या परिसरातील ६०० हेक्टर क्षेत्र होण्याची शक्यता आहे.  प्रतिक्रिया सोयाबीनमध्ये सध्या उपलब्ध असलेले सर्व वाण हे सरळ वाण आहेत. अशा वाणाचे बियाणे बाजारातून एकदा खरेदी केले की त्याचे चांगले बियाणे धरून ते पुढे दोन, तीन वर्ष पेरता येते. तसेच जे एस ३३५ हा फार जुना वाण आहे. यापेक्षा चांगले उत्पादन देणारे अनेक वाण आता उपलब्ध आहेत. त्यामुळे जे एस ३३५ वाण बाजूला सारून नवीन वाण लागवडी खाली आणणे गरजेचे आहे. - डॉ तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com