हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच मोड

हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन काढणीच्या अवस्थेत असताना सतत पाऊस सुरु आहे. अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
 Soybean pods sprout on trees in Hingoli district
Soybean pods sprout on trees in Hingoli district

हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन काढणीच्या अवस्थेत असताना सतत पाऊस सुरु आहे. अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. सोयाबीनच्या शेंगा भिजून-भिजून त्यांना झाडावरच मोड फुटले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हिंगोली जिल्ह्यात यंदा सोयाबीनची २ लाख ४७ हजार ५८१ हेक्टरवर, तुरीची ४५ हजार ५५२ हेक्टरवर, तर ३८ हजार ९६५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. सोयाबनीनचे पीक काढणीच्या अवस्थेत आहे. अनेक भागात कपाशीची बोंडे फुटली आहेत. तुरीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पाऊस उघडीप द्यायला तयार नाही. दररोज दुपारनंतर पाऊस येत आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशीत पाणीच पाणी झाले आहे. 

हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील  मंडळामध्ये यंदा सुरवातीपासून पाऊस जास्त आहे. येळेगाव, साळणा, कुरुंदा, गिरगाव आदीसह मंडळात अनेकवेळा अतिवृष्टी झाली. औंढाना नागनाथ तालुक्यातील साळणा, गोजेगाव, केळी, धार, माथा, पोटा, रुपुर, पार्डी, सावळी, पेरजाबाद, नांदाखेडा, बेरुळा, अनखळी पोटा येथे सोयाबीन, तूर, कपाशी सह हळद पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

सोयाबीनच्या शेंगाना झाडावरच मोड फुटले आहेत. त्यामुळे मालाची प्रत खराब होणार आहे. पाऊस उघडला, तर ठीक नाहीतर पूर्ण पीक हातचे जाणार आहे. पीकविमा परताव्यासह आर्थिक मदत करावी. — अनिल सांगळे, गोजेगाव, जि. हिंगोली  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com