Agriculture news in Marathi Soybean pods sprouted in Yavatmal district | Page 2 ||| Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले कोंब

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व अवस्थेतील सोयाबीन शेंगांना चक्क कोंब फुटल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत असून याची दखल घेत सर्वेक्षण करुन भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व अवस्थेतील सोयाबीन शेंगांना चक्क कोंब फुटल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत असून याची दखल घेत सर्वेक्षण करुन भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात खरिपाचे सुमारे नऊ लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी पावणे पाच ते पाच लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड होते. उर्वरित सरासरी चार लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन खाली राहते. त्यामुळेच जिल्ह्याचे दुसरे मुख्य पीक म्हणून सोयाबीनला ओळखले जाते. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. त्याच्या परिणामी जिल्ह्याच्या सोळा तालुक्यात उगवणविषयक समस्येचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्यानंतरही दुबार- तिबार पेरणी करून शेतकऱ्यांनी पीक वाढविले.

दरम्यान पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतानाच त्यावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात चक्रीभुंग्याने देखील पीक पोखरल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभाग व तत्सम यंत्रणांकडे केल्या. त्यावर मलमपट्टी म्हणून कृषी विभागाकडून पुसद, महागाव तालुक्यातील शिवारांना भेटी देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. उपाययोजना संदर्भाने मार्गदर्शनही करण्यात आले. परंतु किडीने नुकसान पातळी ओलांडल्याने त्याचा अपेक्षित फायदा होऊ शकला नाही.

जिल्ह्यात कीड-रोगामुळे सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या संदर्भाने सर्वेक्षण व पंचनामे होत भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवर आता पुन्हा नव्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण कायम आहे. परिणामी परिपक्व होण्याच्या अवस्थेतील सोयाबीनला सूर्यप्रकाश मिळू शकला नाही. त्यामुळे शेंगांतील दाण्यांना अक्षरशः कोंब फुटले आहेत. महागाव तालुक्यातील वाकद इजारा येथील विनोद राठोड यांचे दहा एकरावर सोयाबीन आहे. तर बोरी इजारा येथील सुनील बळीराम राठोड यांच्या चार एकर क्षेत्रावरील सोयाबीनमधील दाण्यांना कोंब फुटण्याचा प्रकार समोर आला आहे. शिवारात अशा प्रकारची समस्या पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे या दोन्ही शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.

खोडकीड चक्रीभुंगा आणि आता परिपक्व आणि काढण्याचे अवस्थेतील सोयाबीन शेंगाच्या दाण्यांना कोंब फुटत आहेत. नैसर्गिक आपत्तीने अशाप्रकारे सोयाबीन उत्पादकांचा पिच्छा पुरवला असला तरी शासनाने मात्र याची कोणत्याच स्तरावर दखल घेतली नाही हे दुर्दैवी आहे.
- मनीष जाधव, शेतकरी, वाकद, ता. महागाव, जि. यवतमाळ

सोयाबीनवर सुरुवातीला खोडमाशीचा प्रादुर्भाव होता. ही कीड नियंत्रणात आहे. काही प्रमाणात दाणे भरण्याची अडचण म्हणजे दाण्याचे वजन या किडीच्या प्रादुर्भावामुळे घटू शकते. परिणामी यामुळे होणारे नुकसान कमी आहे असे म्हणता येईल. वीसपैकी ६-७ झाडांवर याचा प्रभाव होता. चक्रीभुंग्यामुळे होणारे नुकसान मात्र अधिक आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये पानाचा करपा याचा प्रादुर्भाव दिसून आला होता. तंत्रशुद्ध व्यवस्थापन नसणे आणि युरियाचा अधिक वापर कीड रोगांच्या प्रसाराला पूरक ठरला आहे. आता जिल्ह्याच्या काही भागात सोयाबीन शेंगांना कोंब फुटण्याचे प्रकार समोर आले आहेत. पावसाची संततधार तसेच ढगाळ वातावरणामुळे जमिनीत ओलावा कायम राहिला. त्यामुळे झाड हिरवे राहात हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे.
- डॉ. प्रमोद मगर,
कीटकशास्त्रज्ञ, यवतमाळ कृषी विज्ञान केंद्र

 


इतर ताज्या घडामोडी
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना...ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर,...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
संरक्षित शेतीचे महत्त्वसंरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा...
पोषक आहारासाठी बियाणे स्वावलंबन...येत्या काळात कमी पाण्यावर येणारी पिके बाजरी,...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...