Agriculture News in Marathi Soybean price improvement | Page 2 ||| Agrowon

सोयाबीन दरात सुधारणा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा टप्प्याटप्प्याने विक्रीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण दिवाळीनंतर बाजारात आवक वाढेल, असा अंदाज व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग बांधून होता.

पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा टप्प्याटप्प्याने विक्रीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण दिवाळीनंतर बाजारात आवक वाढेल, असा अंदाज व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग बांधून होता. मात्र आवक काहीशी वाढल्यानंतरही प्लांट्सची खरेदी वाढल्याने दरातही १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली. तर सोयापेंडच्या दरातही एक हजार ते दीड हजार रुपयांची वाढ झाली. पुढील आठवड्यातही हे दर कायम राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

दिवाळीनंतर देशभरातील बाजार समित्यांत सोयाबीनची आवक काहीशी वाढली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक खूपच कमी आहे. त्यातच सोयाबीन प्रक्रिया प्लांट्सची खरेदीही वाढली. त्यामुळे काहीशी आवक वाढल्यानंतरही दरावर दबाव आला नाही तर बाजारात सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली. गेल्या वर्षी सोयाबीन दरात आलेली तेजी पाहता शेतकरी कमी दरात सोयाबीन विक्री करण्यास इच्छुक दिसत नाहीत. सध्या स्टॉकिस्ट या दरात कमी स्टॉक करत आहेत. दिवाळीनंतर चालू आठवड्यात सोयाबीन दरात देशभरातील बाजार समित्यांमध्ये १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली. 

बाजारात सोयाबीनला मागणी आहे, परंतु पुरवठा नसल्याने दराला आधार मिळत आहे. चालू आठवड्यात देशभरातील बाजार समित्यांत दैनंदिन आवक सात ते साडेसात लाख पोत्यांची होती. मध्य प्रदेशात सोयाबीनला सरासरी ५००० ते ५६०० रुपये प्रति क्विंटल दर चालू आठवड्यात मिळाला. तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये ४८०० ते ५३०० रुपयाने सोयाबीन विकले गेले. राजस्थानमध्ये सोयाबीनला चालू आठवड्यात सरासरी ५००० ते ५६०० रुपये दर मिळाला. ऐन हंगामातही आवक अपेक्षेप्रमाणे वाढत नाही म्हटल्यावर दरवाढ झाली आहे. 

प्लांट्चे दर २०० ते २५०० रुपयांनी सुधारले 
यंदा देशभरात थेट प्लांट विक्री वाढली आहे. चालू आठवड्यात प्लांट्चे दर २०० ते २५० रुपयांनी वाढले आहे. मध्य प्रदेशात या वाढीसह सोयाबीनला प्लांट दर ५३०० ते ५५०० रुपये राहिला. तर महाराष्ट्रात हाच दर ५५०० ते ५७०० रुपयांवर पोहोचला. राजस्थानमध्ये देशात सर्वाधिक प्लांट्स दरची नोंद चालू आठवड्यात झाली. येथे सोयाबीनला ५६०० ते ५७५० रुपये दर मिळाला. 

सोयाबीन तेलाचे दर कमी झाले 
सोयाबीन तेलाचा विचार करता दरात चालू आठवड्यात ५० ते ७० रुपयांची घसरण झली. तेल दर कमी करण्यासाठी सरकार विविध उपाय करत आहे, त्यातच साठा मर्यादेची टांगती तलवार असल्याने व्यापारी आणि उद्योग जास्त साठा करताना दिसत नाहीत. त्यामुळे दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली. चालू आठवड्यात सोयाबीन तेलाला मध्य प्रदेशात प्रतिदहा १० किलोला १२३५ ते १२५५ रुपये दर मिळाला. तर महाराष्ट्रात १२३० ते १२६० रुपये, राजस्थानमध्ये १२३५ ते १२६० रुपये आणि गुजरातमध्ये १२२० ते १२३० रुपये दर मिळाला. 

सोयापेंडच्या दरात सुधारणा 
चालू आठवड्यात सोयाबीनचे दर वाढल्याने प्लांट्सनी सोयापेंडच्या दरातही वाढ केली आहे. आठवड्यात सोयापेंडच्या दरात एक हजार ते दीड हजार रुपयांची वाढ झाली. या वाढीसह मध्य प्रदेशात सोयापेंडचे दर ४१ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. महाराष्ट्रात ४२ हजार ते ४५ हजार रुपयांनी सोयापेंडचे व्यवहार होत आहेत. तर राजस्थानमध्ये ४३ हजार ५०० ते ४४ हजार रुपये दर सोयापेंडला मिळत आहे. 


इतर अॅग्रोमनी
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....