Agriculture News in Marathi Soybean price improvement Lasts even on weekends | Page 3 ||| Agrowon

सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या शेवटीही कायम 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 डिसेंबर 2021

चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात झालेली सुधारणा शनिवारीही कायम होती. बाजार समित्यांत शनिवारी १०० ते ३०० रुपयांपर्यंत दरात सुधारणा झाली होती.

पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात झालेली सुधारणा शनिवारीही कायम होती. बाजार समित्यांत शनिवारी १०० ते ३०० रुपयांपर्यंत दरात सुधारणा झाली होती. अनेक बाजार समित्यांत सर्वसाधारण दर ६ हजार ३०० रुपयांवर पोहोचला आहे. मात्र केंद्रीय मंत्र्यांनी पोल्ट्री उद्योगाची ५.५ लाख टन सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढीची मागणी पुढे रेटल्याने शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

सोयाबीन दरात सलग चौथ्या दिवशी सुधारणा झाली आहे. वायद्यांसह हजर बाजार आणि बाजार समित्यांतही सोयाबीनच्या दरात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. पुरुषोत्तम रूपाला यांनी विदेश व्यापार महासंचालक अमित यादव यांना पत्र लिहिल्याचे वृत्त बाजारात पसरल्यानंतर सोमवारी (ता. २९) सोयाबीन दरात घसरण झाली. सोयाबीन दरात घसरण होण्याची स्थिती बुधवारी दुपारपर्यंत सुरू होती. सर्वंच बाजारात दर घसरण झाल्याने सोयाबीनची पुढील वाटचाल कशी राहील, या बाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र बाजारात दर कमी झाल्यानंतर आवक वाढेल, बाजारात पॅनिक स्थिती निर्माण होऊन शेतकरी जास्तीत जास्त माल विक्रीसाठी आणतील, अशी आशा होती.

मात्र बाजारात दर कमी झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी घाबरून विक्री केली नाही. त्यामुळे बुधवारी दुपारपासून कमी जात जाणारे दर स्थिरावले आणि काहीसे वाढीसह बाजार बंद झाले. गुरुवारी बाजार सुधारणेसह सुरू झाला. त्यानंतर शनिवारपर्यंत बाजार समित्यांत दरात सुधारणा झाली. तर वायद्यांत हजर बाजारात गुरुवारी आणि शुक्रवारीही सुधारणा झाली. 

शनिवारच्या सुट्टीच्या आधी शुक्रवारी वायदे आणि हजर बाजारात सुधारणा झाली होती. जानेवारीच्या वायद्यात ३५० रुपयांची सुधारणा होऊन सौदे ६ हजार ३९३ रुपयांवर बंद झाले. तर हजर बाजारातही दरात २०० रुपयांची सुधारणा होऊन दर सरासरी ६ हजार ५५० रुपयांवर पोहोचले होते. शुक्रवारी वायदे आणि हजर बाजारातील दर वाढीसह बंद झाले. त्याची प्रतिक्रिया शनिवारी वायदे आणि हजर बाजारातील सौदे बंद असले तरी बाजार समित्यांमध्ये सकारात्मक उमटली.

बाजार समित्यांत दुपारी ४ वाजेपर्यंत दरात सुधारेणाच ट्रेंड होता. वाशीम बाजार समितीत सोयाबीनचा सर्वसाधारण दर शुक्रवारच्या तुलनेत ३०० रुपयांनी सुधारून ६ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. किमान दर ५ हजार ५०० रुपये तर कमाल दर ७ हजार १०० रुपये मिळाला. परभणी बाजार समितीत सर्वसाधारण दर ६ हजार २५० रुपयांवर स्थिर होता. मेहकर बाजार समितीत सोयाबीनला शनिवारी ६ हजार ५०० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. दरात ३०० रुपयांची सुधारणा झाली होती. 

सरकारच्या निर्णयाकडे 
लक्ष देऊन विक्री करावी 

दरात घसरण झाल्यानंतर पुन्हा दराने उभारी घेतली असली तरी काही मुद्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सोयापेंड आयातीसाठी खुद्द केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री यांनीही पोल्ट्री उद्योगाची मागणी पुढे रेटली आहे. त्यांच्या मागणीला सर्वच स्थरांतून विरोध झाला असला तरी सरकारने सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यास दरावर परिणाम होऊ शकतो. त्यातच देशातून सोयापेंड निर्यात थांबली आहे. कारण सोयापेंड निर्यात पडतळ नसल्याने निर्यात होत नसल्याचे निर्यातदारांनी सांगितले. जागतिक बाजारात भारतीय सोयापेंड महाग पडत आहे. त्यातच सरकारने आयातीचा निर्णय घेतल्यास दरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्याने सोयाबीन विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

 
 


इतर बातम्या
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या ...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा,...
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...