Soybean Market Rate : नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम 

कळमणा बाजार समितीत ८००० ते ९४५० रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. बाजारात नव्या हंगामातील सोयाबीन येण्यास बराच कालावधी असल्याने दरातील तेजी यापुढील काळात देखील कायम राहण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांकडून वर्तविण्यात आला.
Soybean price race continues in Nagpur
Soybean price race continues in Nagpur

नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने सोयाबीन दरात तेजी अनुभवली जात आहे. गेल्या आठवड्यात वाशीम व लातूर बाजार समितीत सोयाबीनने दहा हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. सोयाबीन दरातील ही घोडदौड कायम असून कळमणा बाजार समितीत ८००० ते ९४५० रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. बाजारात नव्या हंगामातील सोयाबीन येण्यास बराच कालावधी असल्याने दरातील तेजी यापुढील काळात देखील कायम राहण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांकडून वर्तविण्यात आला. 

खाद्यतेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांकडून प्रक्रियेकामी सोयाबीनला देखील मागणी वाढती आहे. त्याचा परिणाम खाद्यतेलाच्या दरासोबतच कच्चा सोयाबीनवर देखील झाला आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ७००० ते ९००० रुपये क्‍विंटल होते. सोयाबीनची आवक अवघी २० क्‍विंटलची असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. 

वाशीम, लातूर बाजार समितीत सोयाबीनने १० हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. नागपूरच्या कळमणा बाजार समितीत देखील सोयाबीनमधील तेजी अनुभवली जात असून दर ८००० ते ९४५० रुपयाने व्यवहार होत आहे. सोयाबीनची आवक देखील ४३ क्‍विंटलची होती. बाजारात गव्हाची आवक ५०० क्‍विंटल आणि दर १६५० ते १८७६ होता. तांदूळ आवक १९ क्‍विंटलची असून दर २४०० ते २६०० रुपयांप्रमाणे होते. बाजारात हरभऱ्याची सरासरी आवक एक हजार क्‍विंटलची आहे. हरभरा दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत तेजी अनुभवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात हरभरा दर ४४०० ते ४८२६ होते. या आठवड्यात ते ४५०० ते ५०६२ रुपयांवर पोचल्याचे बाजार समिती सूत्रांकडून सांगण्यात आले. 

भुईमूग शेंगाचे व्यवहार ४००० ते ५००० रुपयांनी होत असून आवक अवघी ५५ क्‍विंटलची नोंदविण्यात आली. आंबा आवक १००० क्‍विंटल तर दर २१०० ते २३०० रुपये होते. बटाटा १००० ते १२०० रुपये आणि आवक २९२१ क्‍विंटलची होती. कांदा आवक ११०० क्‍विंटल आणि दर १७०० ते २१०० रुपये होते. आले आवक ८७४ क्‍विंटल तर दर १८०० ते २६०० रुपये क्‍विंटल. टोमॅटो आवक २६० क्‍विंटल आणि दर १५०० ते १७०० रुपये.

मोसंबीच्या दरात घसरण  बाजारात मोसंबीची आवक नियमीत असली तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात ३३०० ते ३८०० रुपये असलेले मोसंबीचे दर या आठवड्यात ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. लहान आकाराच्या फळांचे व्यवहार १६०० ते २००० रुपये आणि मध्यम आकारांच्या फळांना २००० ते २४०० रुपये दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com