Agriculture news in Marathi Soybean price race continues in Nagpur | Page 3 ||| Agrowon

नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

कळमणा बाजार समितीत ८००० ते ९४५० रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. बाजारात नव्या हंगामातील सोयाबीन येण्यास बराच कालावधी असल्याने दरातील तेजी यापुढील काळात देखील कायम राहण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांकडून वर्तविण्यात आला. 

नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने सोयाबीन दरात तेजी अनुभवली जात आहे. गेल्या आठवड्यात वाशीम व लातूर बाजार समितीत सोयाबीनने दहा हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. सोयाबीन दरातील ही घोडदौड कायम असून कळमणा बाजार समितीत ८००० ते ९४५० रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. बाजारात नव्या हंगामातील सोयाबीन येण्यास बराच कालावधी असल्याने दरातील तेजी यापुढील काळात देखील कायम राहण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांकडून वर्तविण्यात आला. 

खाद्यतेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांकडून प्रक्रियेकामी सोयाबीनला देखील मागणी वाढती आहे. त्याचा परिणाम खाद्यतेलाच्या दरासोबतच कच्चा सोयाबीनवर देखील झाला आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ७००० ते ९००० रुपये क्‍विंटल होते. सोयाबीनची आवक अवघी २० क्‍विंटलची असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. 

वाशीम, लातूर बाजार समितीत सोयाबीनने १० हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. नागपूरच्या कळमणा बाजार समितीत देखील सोयाबीनमधील तेजी अनुभवली जात असून दर ८००० ते ९४५० रुपयाने व्यवहार होत आहे. सोयाबीनची आवक देखील ४३ क्‍विंटलची होती. बाजारात गव्हाची आवक ५०० क्‍विंटल आणि दर १६५० ते १८७६ होता. तांदूळ आवक १९ क्‍विंटलची असून दर २४०० ते २६०० रुपयांप्रमाणे होते. बाजारात हरभऱ्याची सरासरी आवक एक हजार क्‍विंटलची आहे. हरभरा दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत तेजी अनुभवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात हरभरा दर ४४०० ते ४८२६ होते. या आठवड्यात ते ४५०० ते ५०६२ रुपयांवर पोचल्याचे बाजार समिती सूत्रांकडून सांगण्यात आले. 

भुईमूग शेंगाचे व्यवहार ४००० ते ५००० रुपयांनी होत असून आवक अवघी ५५ क्‍विंटलची नोंदविण्यात आली. आंबा आवक १००० क्‍विंटल तर दर २१०० ते २३०० रुपये होते. बटाटा १००० ते १२०० रुपये आणि आवक २९२१ क्‍विंटलची होती. कांदा आवक ११०० क्‍विंटल आणि दर १७०० ते २१०० रुपये होते. आले आवक ८७४ क्‍विंटल तर दर १८०० ते २६०० रुपये क्‍विंटल. टोमॅटो आवक २६० क्‍विंटल आणि दर १५०० ते १७०० रुपये.

मोसंबीच्या दरात घसरण 
बाजारात मोसंबीची आवक नियमीत असली तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात ३३०० ते ३८०० रुपये असलेले मोसंबीचे दर या आठवड्यात ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. लहान आकाराच्या फळांचे व्यवहार १६०० ते २००० रुपये आणि मध्यम आकारांच्या फळांना २००० ते २४०० रुपये दर मिळत आहे.


इतर बाजारभाव बातम्या
केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटल दरजळगाव : केळी दरात गेल्या दोन दिवसात किरकोळ घसरण...
पुण्यात पालेभाज्यांची आवक स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बऱ्हाणपूरला केळीला हंगामातील सर्वाधिक दरजळगाव :  खानदेशात केळीचे दर टिकून आहेत. मध्य...
राज्यात सीताफळ १००० ते १४००० रुपये...सोलापुरात प्रतिक्विंटलला २००० ते ५००० रुपये...
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...