Agriculture news in Marathi Soybean price rise due to market imbalance | Agrowon

बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021

जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली वाढ ही गुंतणूकदारांच्या टेक्याने नाही तर बाजारातील मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलनामुळे झाल्याचे जाणकारांनी सांगितले.

पुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली वाढ ही गुंतणूकदारांच्या टेक्याने नाही तर बाजारातील मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलनामुळे झाल्याचे जाणकारांनी सांगितले. तसेच सोयाबीन, मका आणि गहू बाजारातील फंडामेन्टल्स दरवाढीला पूरक असल्याचंही प्रक्रिया उद्योगातील जाणकारांनी जिनिव्हा येथील परिषदेमध्ये सांगितले. 

शेतीमालाच्या दरात झालेल्या वाढीसाठी व्यापारातील गुंतवणूकदार जबाबदार नाहीत, तर बाजारातील मागणी आणि पुरवठ्यातील मूलभूत घटक म्हणजेच फंडामेन्टल्समधील असंतुलन जबाबदार आहे, असे जिनिव्हा येथे झालेल्या ग्लोबल ग्रेन्स कॉन्फरन्समध्ये कृषी उद्योगातील जाणकारांनी सांगितले. शेतीमालाला व्यापारी, ग्राहक आणि सरकारांकडून मागणी वाढली त्यामुळे दरवाढीत मोठी आर्थिक गुंतवणूक झाल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला. अनिश्‍चित काळासाठी मागणी वाढल्याने दरवाढीला बळ मिळाले. त्याचा परिणाम म्हणून सध्या मका, गहू आणि सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे. 

युक्रेनच्या कृषी विभागाचे उपमंत्री तारस कचका म्हणाले, की सध्या शेतीमालाच्या दरात झालेली वाढ ही अनेक वर्षांतील उच्चांकी आहे. ही दराची स्थिती म्हणजे बाजारातील नवीन स्केल म्हणता येईल. परंतु मका, सोयाबीन आणि गहू दरातील ही वाढ शाश्‍वत नाही. 

कोरोना काळात व्यापार विस्कळीत
कोरोना काळात शेतीमालाची मागणी वाढली आणि लॉजिस्टिक सुविधा विस्कळीत झाली. त्यामुळे एकीकडे मागणी वाढत गेली, मात्र निर्यात प्रभावित झाल्याने पुरवठा कमी राहिला. त्यातच ब्राझीलच्या मका उत्पादनात २० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली. येथे मक्याच्या उत्पादनात आणि काढणीत घट होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेत दुष्काळी स्थितीमुळे गव्हाच्या उत्पादनात घट होणार आहे. तर पूर्व युरोप आणि ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या पावसाने पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे गव्हाच्या बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मका गहू आणि सोयाबीनचे दर जागतिक सर्वच वायदे बाजारांत वाढले आहेत. महत्त्वाच्या शिकागो वायद्यांमध्ये चीनची मागणी आणि वातावरणातील बदलाच्या भीतीमुळे सुधारणा झाली आहे. त्यातच इंधन आणि गॅसच्या दरात सुधारणा झाल्याने कृषी निविष्ठांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मका, गहू आणि सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.

गुंतवणूकदारांमध्ये दरात मोठी वाढ होऊन सुपरसायकल तयार होण्यास पूरक फंडामेन्टल्स सध्या तरी दिसत नाहीत. परंतु येणाऱ्या काळात मका, सोयाबीन आणि गव्हाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बाजारात अद्यापही मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलनाची स्थिती उद्‍भवत आहे. शेतीमालाच्या दरवाढीमागे कोरोना महामारी, मागणीत अतिवाढ, काही देशांत पीक काढणी न होणे आणि पिकांची घटलेली गुणवत्ता ही दरवाढीमागील महत्त्वाची मूलभूत कारणे आहेत. 
- केसेनिया बोलोमाटोवा, रशिया

चीनची सोयाबीन मागणी बदलली आहे. चीनच्या मागणीमुळे जगाची मागणी बदलते. जेव्हा चीनने साठा वाढविण्यासाठी ३० दशलक्ष टन मक्याची आयात केल्यानंतर सर्व बाजार बदलला. यामुळे दर वाढले, मात्र चीनची ही गुंतवणूक शाश्‍वत नसून दरवाढही दीर्घकालीन नाही. 
- यवेस पाचे, सोयाबीन ट्रेड हाउस, स्वित्झर्लंड
 


इतर अॅग्रोमनी
बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढपुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली...
कापूस आवक वाढूनही दर स्थिरावले जळगाव ः  कापड उद्योगातील वाढती महागाई व...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील...
सोयाबीन दरात सुधारणा पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा...
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...