Agriculture news in Marathi Soybean price support due to export verification | Page 3 ||| Agrowon

निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे निर्यात कमी होती. मात्र सध्या सोयापेंड आयात व निर्यातीचे दर हे ४१ हजार रुपये प्रतिटनांच्या जवळपास आहेत.

पुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे निर्यात कमी होती. मात्र सध्या सोयापेंड आयात व निर्यातीचे दर हे ४१ हजार रुपये प्रतिटनांच्या जवळपास आहेत. त्यामुळे निर्यात पडतळ (पॅरिटी) निर्माण झाली असून बाजारात सोयाबीनच्या पाच हजार रुपये दराला आधार निर्माण झाला आहे. 

देशात सोयापेंडचा वापर यंदा वाढल्याचे युएसडीएसोबतच देशातील काही संस्थांनी म्हटले आहे. युएसडीएच्या मते भारतात यंदा सोयापेंडचे उत्पादन ७७ लाख टन होण्याचा अंदाज असून वापर ७० लाख टनांवर पोचण्याची शक्यता आहे. पोल्ट्री उद्योगाच्या अंदाजानुसार यंदा उद्योगातून ६१ लाख टनांपर्यंत मागणी राहील. तर उर्वरित वापर हा मस्त्य, पशुधन आणि मानवी आहारात होईल. सोपाच्या माहितीनुसार मागील हंगामात जवळपास १९ लाख टन सोयापेंड निर्यात झाली होती. 

जागतिक पातळीवरही यंदा सोयापेंड भाव खात आहे. त्यामुळे भारतात आयातही महाग होत असून देशातील दर आता आयात पडतळीवर आले आहेत. त्यातच देशात मागणी मजबूत असल्याने दर अधिक होते त्यामुळे सोयापेंड निर्यात कमी होत आहे. अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिकेतील फ्री ऑन बोर्ड सरासरी निर्यात ऑफर मूल्य जवळपास स्थिर आहे. तर भारताच्या फ्री ऑन बोर्ड सरासरी निर्यात ऑफर मूल्यात मोठे चढउतार होताना दिसत आहे. त्यामुळे देशातील सोयापेंडचे दर हे स्पर्धात्मक नव्हते. परंतु आता दर पडतळ पातळीवर आले आहेत. त्यामुळे सोयापेंड निर्यात होण्यास अनुकूल स्थिती आहे. 

अशी झाली निर्यात
यंदाच्या वर्षाचा आढावा घेतल्यास जानेवारी २०२१ मध्ये फ्री ऑन बोर्ड सरासरी निर्यात ऑफर मूल्य ५२९ डॉलर प्रतिटन होते, फेब्रुवारीत वाढून ५५३ डॉलर, मार्चमध्ये ५७९ डॉलर, एप्रिल ७८१ डॉलर, मे ८३६ डॉलर, जून महिन्यात ७८३ डॉलर जुलैत ९५० डॉलर, तर ऑगस्ट महिन्यात ११३३ डॉलर आणि सप्टेंबर महिन्यात काहीसे कमी होऊन १०६९ डॉलर प्रतिटन झाले होते. त्यामुळे एवढ्या चढ्या दराने विदेशातून मागणी नव्हती. त्यामुळे देशातून सोयापेंडची निर्यात एप्रिलमध्ये ४० टन आणि मे महिन्यात ५२ हजार टन आणि त्यानंतर कमी होऊन जुलै महिन्यात २७ हजार टनांवर आले. ऑगस्ट महिन्यात निर्यात ११ हजार टन आणि सप्टेंबरमध्ये ६ हजार टन सोयापेंडची निर्यात झाली. 

पाच हजाराचा आधार
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशात सोयाबीनचा मोठा तुटवडा होता. त्यामुळे सोयापेंडचा दरही वाढला होता. मात्र, ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत दर हे कमी होत असतानाच सोयापेंडचे दर निर्यात पडतळ पातळीपर्यंत येत होते. सध्या बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार रुपये प्रतिक्विंटल असताना आयात आणि निर्यात दर ४१ हजार रुपये प्रतिटनांच्या जवळपास आहेत. त्यामुळे दरही पडतळ पातळीवर आले आहेत.


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...