हिंगोलीत सोयाबीनचे दर  ४६५० ते ४८५० रुपये क्विंटल 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) गेल्या आठवडाभरात सोयाबीनचे सरासरी दर प्रति क्विंटल ४६५० ते ४८५० रुपये होते.
हिंगोलीत सोयाबीनचे दर  ४६५० ते ४८५० रुपये क्विंटल  Soybean prices in Hingoli 4650 to 4850 per quintal
हिंगोलीत सोयाबीनचे दर  ४६५० ते ४८५० रुपये क्विंटल  Soybean prices in Hingoli 4650 to 4850 per quintal

हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) गेल्या आठवडाभरात सोयाबीनचे सरासरी दर प्रति क्विंटल ४६५० ते ४८५० रुपये होते. भविष्यात दर वाढतील, या अपेक्षेने अनेक शेतकरी सोयाबीन वाळवून साठवणूक करत आहेत. परंतु आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कमी दराने विक्री करावी लागत आहे.  हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार मार्केटमध्ये यंदाच्या हंगामात लवकर येणाऱ्या वाणाच्या नवीन सोयाबीनची आवक झाल्यानंतर नऊ सप्टेंबर रोजी मुहूर्तावर कमाल ११ हजार २१ रुपये दर देण्यात आले होते. त्याची विविध माध्यमांतून भरपूर प्रसिद्धी करण्यात आली. त्यामुळे यंदा सोयाबीनला चांगले दर राहतील, अपेक्षित फायदा होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु ऑक्टोबर महिन्यात नवीन सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्यानंतर दरात मोठी घसरण झाली. आर्द्रता, डागील, माती मिश्रित माल असल्याचे कारण सांगत भाव पाडून खरेदी केली जात आहे. त्यामुळे सोयाबीनचे प्रति क्विंटलचे दर पाच हजार रुपयांपेक्षाही खाली गेले आहेत. हिंगोली बाजार समित्याच्या भुसार मार्केटमध्ये सोमवारी (ता.१८) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होऊन किमान ४४०० ते कमाल ४९०० रुपये, तर सरासरी ४६५० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २०) सोयाबीनची ११८० क्विंटल आवक असताना किमान ४५०० ते कमाल ५१८० रुपये, तर सरासरी ४८४० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २१) सोयाबीन १२०५ क्विंटल आवक असताना किमान ४५०० ते कमाल ५०५० रुपये, तर सरासरी ४७७५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २२) सोयाबीनची ११०० क्विंटल आवक असताना किमान ४५५० ते कमाल ५०५० रुपये, तर सरासरी ४८०० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.२३) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होऊन किमान ४५०० ते ५२०० रुपये, तर सरासरी ४८५० दर मिळाले. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे किमान दर ४४०० रुपये, तर कमाल ५१८० रुपये प्रति क्विंटल एवढे राहिले. खरेदी मुहूर्ताला दिलेल्या दरापेक्षा निम्म्याहून अधिक दर घसरल्यामुळे सोयाबीन उत्पादकांचे नुकसान होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com