Agriculture News in Marathi Soybean prices in Hingoli 4650 to 4850 per quintal | Page 2 ||| Agrowon

हिंगोलीत सोयाबीनचे दर  ४६५० ते ४८५० रुपये क्विंटल 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) गेल्या आठवडाभरात सोयाबीनचे सरासरी दर प्रति क्विंटल ४६५० ते ४८५० रुपये होते.

हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) गेल्या आठवडाभरात सोयाबीनचे सरासरी दर प्रति क्विंटल ४६५० ते ४८५० रुपये होते. भविष्यात दर वाढतील, या अपेक्षेने अनेक शेतकरी सोयाबीन वाळवून साठवणूक करत आहेत. परंतु आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कमी दराने विक्री करावी लागत आहे. 

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार मार्केटमध्ये यंदाच्या हंगामात लवकर येणाऱ्या वाणाच्या नवीन सोयाबीनची आवक झाल्यानंतर नऊ सप्टेंबर रोजी मुहूर्तावर कमाल ११ हजार २१ रुपये दर देण्यात आले होते. त्याची विविध माध्यमांतून भरपूर प्रसिद्धी करण्यात आली. त्यामुळे यंदा सोयाबीनला चांगले दर राहतील, अपेक्षित फायदा होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु ऑक्टोबर महिन्यात नवीन सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्यानंतर दरात मोठी घसरण झाली. आर्द्रता, डागील, माती मिश्रित माल असल्याचे कारण सांगत भाव पाडून खरेदी केली जात आहे. त्यामुळे सोयाबीनचे प्रति क्विंटलचे दर पाच हजार रुपयांपेक्षाही खाली गेले आहेत. हिंगोली बाजार समित्याच्या भुसार मार्केटमध्ये सोमवारी (ता.१८) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होऊन किमान ४४०० ते कमाल ४९०० रुपये, तर सरासरी ४६५० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. २०) सोयाबीनची ११८० क्विंटल आवक असताना किमान ४५०० ते कमाल ५१८० रुपये, तर सरासरी ४८४० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २१) सोयाबीन १२०५ क्विंटल आवक असताना किमान ४५०० ते कमाल ५०५० रुपये, तर सरासरी ४७७५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २२) सोयाबीनची ११०० क्विंटल आवक असताना किमान ४५५० ते कमाल ५०५० रुपये, तर सरासरी ४८०० रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता.२३) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होऊन किमान ४५०० ते ५२०० रुपये, तर सरासरी ४८५० दर मिळाले. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे किमान दर ४४०० रुपये, तर कमाल ५१८० रुपये प्रति क्विंटल एवढे राहिले. खरेदी मुहूर्ताला दिलेल्या दरापेक्षा निम्म्याहून अधिक दर घसरल्यामुळे सोयाबीन उत्पादकांचे नुकसान होत आहे.  


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...