agriculture news in marathi Soybean prices in Nagpur Uncertainty about speed | Agrowon

नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत अनिश्चितता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची उत्पादकता घटली. त्याच्या परिणामी महाराष्ट्रासह सर्वदूर सोयाबीन दरात तेजी अनुभवली जात आहे.

नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची उत्पादकता घटली. त्याच्या परिणामी महाराष्ट्रासह सर्वदूर सोयाबीन दरात तेजी अनुभवली जात आहे. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. आवक  वाढल्यास दर खाली येण्याची भीती व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

केंद्र सरकारने सोयाबीनला यावर्षी ३८८० रुपयाचा हमीभाव जाहीर केला आहे. हमीभावात गेल्या वर्षीच्या तुलनेत १७० रुपयांची वाढ करण्यात आली.

मध्यप्रदेशमध्ये सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांची वाढती मागणी असल्याने सोयाबीनचे दर गेल्या आठवड्यात ४५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते.  त्यानंतर टप्प्याटप्प्याने दर कमी होत ते आता चार हजार रुपयांवर स्थिरावले आहेत. 

नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीनची गेल्या आठवड्यात २७७३ क्विंटलची आवक होती. या आठवड्यात सोयाबीन आवक वाढून ३५०४ क्विंटलवर पोहोचली आहे. सोयाबीनचे व्यवहार ३५०० ते ४००० या दराने होत आहेत. 

मध्यप्रदेशमधील मधील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक दहा हजार पोत्यांपर्यंत पोहोचली आहे. या ठिकाणी सोमवारी (ता. १९)  दर ४१०० रुपये होते. 

वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत आवक अवघी ७०० क्विंटलची होती. ३१०० ते ३८९० चा दर या बाजार समितीत शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला. सध्या शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा अधिक दर मिळत असला तरी आवक वाढल्यास दर खाली येण्याची भीती व्यापारी वर्तवित आहेत. 

 कळमना बाजार समितीत तुरीची ४० क्विंटल आवक आहे. ७५०० ते ८१०० असा दर तुरीला गेल्या आठवड्यात होता. या आठवड्यात तुरीचे दर ६३०० ते ६९०२ इतके खाली घसरले. बाजारात नव्या हंगामातील तूर येण्यास बराच वेळ आहे. 

मुगाची १२ क्विंटल आवक होती. दर चार हजार ते ४५०० रुपये होते. भुईमूग शेंगांची अवघी पाच क्विंटल आवक झाली. ४५०० ते ५००० रुपये मिळाला. 

संत्रा आवक तीन हजार ६४३ क्विंटलवर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात २५०० क्विंटलची आवक होती.  संत्रा दर ४०० ते २००० रुपये क्विंटलचे आहेत. मोसंबीची आवक दोन हजार क्विंटलची असून ३२०० ते ३४०० असा दर आहे.


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...