सोयाबीनची गुढी सात हजारांपार !

वाशीम बाजार समितीत सोमवारी सोयाबीनची प्रति क्विंटल कमाल ७१३१ रुपयांपर्यंत विक्री झाली. तर, लातूर बाजार समितीत ६८०० रुपये तर अकोला बाजारात ६७०० रुपये दर मिळाला.
Soybean prices reached six thousand
Soybean prices reached six thousand

वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी सोयाबीनची प्रति क्विंटल कमाल ७१३१ रुपयांपर्यंत विक्री झाली. तर, लातूर बाजार समितीत  ६८०० रुपये तर अकोला बाजारात ६७०० रुपये दर मिळाला. गुढीपाडवा सणाच्या पूर्वसंध्येला दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  वाशीम बाजार समितीत गेल्या काही दिवसातील सोयाबीन विक्रीचा या बाजार समितीत कल कायम आहे. सोयाबीनला कमीत कमी ६५०० रुपये दर मिळाला. बाजार समितीत ३२३० क्विंटलची आवक झाली होती.  लातूरला त्याचबरोबर हरभरा व तुरीलाही चांगला भाव मिळाला आहे. सोयाबीन तर कमाल सहा हजार ८६० वर गेला आहे. ज्यांनी चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतमाल घरात ठेवला होता त्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे.  अकोला बाजार समितीत आठवड्यात सोयाबीन कमीत कमी ६००० पासून ६४५० दरम्यान विक्री झाले.  सोमवारी मात्र सोयाबीनचा दर वाढून थेट ६५०० जाऊन पोचला. चांगल्या दर्जाचा माल ६७०० पर्यंत विक्री झाला. सकाळी पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने आवकेवर परिणाम झालेला दिसून आला. मागणीच्या तुलनेत माल कमी आल्याने वाढीव दराने खरेदी होत असल्याचे सांगण्यात आले. लातूर बाजार समितीच्या आडत बाजारात सोमवारी (ता. १२) सोयाबीनला सर्वाधिक कमाल भाव सहा हजार ८६० रुपये प्रति क्विंटलला राहिला. सर्वसाधारण भाव सहा हजार ७५० तर किमान भाव पाच हजार ६६१ रुपये राहिला आहे. सोयाबीनची आवक पंधरा हजार क्विंटलपर्यंत आहे. बाजारात हरभऱ्याची आवक वाढू लागली आहे. वीस हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक या बाजारात आहे. हरभऱ्याच्या दरातही तेजी आहे. सोमवारी हरभऱ्याला प्रति क्विंटलला कमाल पाच हजार ४०० रुपये भाव राहिला. सर्वसाधारण भाव पाच हजार १५० तर किमान भाव पाच हजार रुपये राहिला आहे.  लातूर बाजारात गेल्या काही दिवसांपासून तुरीलाही चांगला भाव मिळत आहे. सोमवारी तुरीचा प्रति क्विंटल कमाल भाव सात हजार २३१ रुपये राहिला. सर्वसाधारण भाव सात हजार तर किमान भाव सहा हजार २९९ रुपये राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाचे भाव वाढत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com