Agriculture news in marathi Soybean prices reached six thousand | Page 2 ||| Agrowon

सोयाबीनची गुढी सात हजारांपार !

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 एप्रिल 2021

वाशीम बाजार समितीत सोमवारी सोयाबीनची प्रति क्विंटल कमाल ७१३१ रुपयांपर्यंत विक्री झाली. तर, लातूर बाजार समितीत  ६८०० रुपये तर अकोला बाजारात ६७०० रुपये दर मिळाला. 

वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी सोयाबीनची प्रति क्विंटल कमाल ७१३१ रुपयांपर्यंत विक्री झाली. तर, लातूर बाजार समितीत  ६८०० रुपये तर अकोला बाजारात ६७०० रुपये दर मिळाला. गुढीपाडवा सणाच्या पूर्वसंध्येला दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

वाशीम बाजार समितीत गेल्या काही दिवसातील सोयाबीन विक्रीचा या बाजार समितीत कल कायम आहे. सोयाबीनला कमीत कमी ६५०० रुपये दर मिळाला. बाजार समितीत ३२३० क्विंटलची आवक झाली होती. 

लातूरला त्याचबरोबर हरभरा व तुरीलाही चांगला भाव मिळाला आहे. सोयाबीन तर कमाल सहा हजार ८६० वर गेला आहे. ज्यांनी चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतमाल घरात ठेवला होता त्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे. 

अकोला बाजार समितीत आठवड्यात सोयाबीन कमीत कमी ६००० पासून ६४५० दरम्यान विक्री झाले.  सोमवारी मात्र सोयाबीनचा दर वाढून थेट ६५०० जाऊन पोचला. चांगल्या दर्जाचा माल ६७०० पर्यंत विक्री झाला.

सकाळी पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने आवकेवर परिणाम झालेला दिसून आला. मागणीच्या तुलनेत माल कमी आल्याने वाढीव दराने खरेदी होत असल्याचे सांगण्यात आले.

लातूर बाजार समितीच्या आडत बाजारात सोमवारी (ता. १२) सोयाबीनला सर्वाधिक कमाल भाव सहा हजार ८६० रुपये प्रति क्विंटलला राहिला. सर्वसाधारण भाव सहा हजार ७५० तर किमान भाव पाच हजार ६६१ रुपये राहिला आहे. सोयाबीनची आवक पंधरा हजार क्विंटलपर्यंत आहे. बाजारात हरभऱ्याची आवक वाढू लागली आहे. वीस हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक या बाजारात आहे.

हरभऱ्याच्या दरातही तेजी आहे. सोमवारी हरभऱ्याला प्रति क्विंटलला कमाल पाच हजार ४०० रुपये भाव राहिला. सर्वसाधारण भाव पाच हजार १५० तर किमान भाव पाच हजार रुपये राहिला आहे. 

लातूर बाजारात गेल्या काही दिवसांपासून तुरीलाही चांगला भाव मिळत आहे. सोमवारी तुरीचा प्रति क्विंटल कमाल भाव सात हजार २३१ रुपये राहिला. सर्वसाधारण भाव सात हजार तर किमान भाव सहा हजार २९९ रुपये राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाचे भाव वाढत आहेत.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची...चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात...
राज्यात जांभळांना ३००० ते १६००० रुपयेजळगावात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याची आवक घटली; दरात...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये आंब्यांना सरासरी २४५० ते...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लसूण ३५०० ते १२००० रुपयेपरभणीत क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये परभणी...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार...
पुण्यात कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लिंबू ६०० ते ३००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये...
नागपुरात सोयाबीनला ७४०० रुपयांचा दरनागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात १० ते २०...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ३००० रुपयेजळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये...
सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी टिकूनसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा, मागणी...पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१७)...
राज्यात कांदा १०० ते १५०० रुपयेसोलापुरात क्विंटलला १०० ते १००० रुपये सोलापूर...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...