नागपुरात सोयाबीन दरात तेजी

सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना बाजार समितीत हमीभावापेक्षा दुपटीने सोयाबीनचे व्यवहार होत आहे. विदर्भातील सोयाबीनचे हब असलेल्या वाशीम जिल्ह्यातही सोयाबीन सात हजार रुपये क्विंटलने विकल्या जात आहे.
Soybean prices rise in Nagpur
Soybean prices rise in Nagpur

नागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना बाजार समितीत हमीभावापेक्षा दुपटीने सोयाबीनचे व्यवहार होत आहे. विदर्भातील सोयाबीनचे हब असलेल्या वाशीम जिल्ह्यातही सोयाबीन सात हजार रुपये क्विंटलने विकल्या जात आहे.  

प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने विदर्भात सोयाबीन दरात तेजी आली आहे. वाशीम, कारंजा, अमरावती, यवतमाळ तसेच नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीन सात हजार रुपये क्विंटलने विकल्या जात आहे. कळमना बाजार समितीत सोयाबीनची जेमतेम दीडशे क्विंटल आवक आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ६५०० ते ७१५० होते. या आठवड्यात सोयाबीन दरात काहीशी घसरण होत ६४०० ते ७२०० रुपयांवर दर पोहोचले. सोयाबीनची नवी आवक येण्यास अजून बराच कालावधी असल्याने दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे.

यापुढील काळात देखील सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या खाली राहणार नाही,असे सांगण्यात आले. बाजारात भुईमूग शेंगाची आवक नियमित ३००० ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. गेल्या हंगामात भुईमुगाला पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. या वर्षी मात्र शेंगांची गुणवत्ता नसल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांकडून कमी दर दिला जात आहे. शेंगांची आवक २० क्विंटल इतकी जेमतेम आहे. 

कळमना बाजार समितीत ज्वारीची अवघी तीन क्विंटल आवक झाली. २२०० ते ३००० रुपयांचा दर ज्वारीला होता. बाजारातील गव्हाची आवक ८०० क्विंटलच्या आसपास आहे. गव्हाचे दर १६५० ते १७८२ रुपये होते. तांदळाची आवक दहा क्विंटल तर दर ५००० ते ५५०० रुपये होते. हरभरा आवक ३८९ क्विंटल तर दर ४१०० ते ४६९६ होते. मुगाचे दर ५५०० ते ५८०० रुपये आणि आवक पाच क्विंटल होती. बाजारात केळीची आवक ५५ क्विंटल आणि दर ४५० ते ५५० रुपये क्विंटलचा होता. द्राक्षाची आवक ६५ क्विंटल दर ४००० ते ५००० असा होता. डाळिंबाचे दर सात हजार ते १४ हजार रुपये क्विंटल आणि आवक ९६० होती.

मोसंबीची नियमित आवक कळमना बाजार समितीत सद्यःस्थितीत मोसंबीची सरासरी ३०० क्विंटल आवक होत आहे.  गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या फळांना पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल असा दर होता. या आठवड्यात देखील मोसंबीचे दर स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com