अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनात घट

यंदा, ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात ७ लाख ६० हजार टन इतकी घट अपेक्षीत आहे, असा अंदाज तेथील सरकारी कृषी कंपनी कॉनॅबने वर्तवला आहे.
अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनात घट Soybean production declines in Brazil after US
अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनात घट Soybean production declines in Brazil after US

पुणे ः प्रतिकूल हवामानामुळे  ब्राझीलमध्ये चालू हंगामात सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. लागवड क्षेत्रात वाढ झाली असूनही उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. यंदा, ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात ७ लाख ६० हजार टन इतकी घट अपेक्षीत आहे, असा अंदाज तेथील सरकारी कृषी कंपनी कॉनॅबने वर्तवला आहे. 

जानेवारीच्या अंदाजानुसार ब्राझीलमधील अपेक्षीत सोयाबीन उत्पादन १३ कोटी ३७ लाख टन इतके आहे, तर मागील महिन्यातील अंदाजानुसार ते १३ कोटी ४४ लाख टन इतके होते. असे असले तरी लागवड क्षेत्रात मात्र वाढ अपेक्षीत आहे. २०२०-२१च्या हंगामात, ब्राझीलमधील

सोयाबीनचे लागवड क्षेत्र जवळपास ३८२ लाख हेक्टर इतके होण्याचा अंदाज असून, त्यात १७ हजार हेक्टरची वाढ अपेक्षित आहे. उत्पादकतेत घट झाली असल्याने लागवड क्षेत्रात वाढ होऊन सुद्धा उत्पादनात घट होणार आहे.

उत्पादनात घट होणार असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात सात टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.  गेल्या वर्षी, ब्राझीलने सोयाबीन निर्यातीत तब्बल ३४ टक्क्यांची वाढ नोंदवली असून, ७५० लाख टन सोयाबीन परदेशात रवाना झाले होते. एकूण निर्यातीपैकी ७३ टक्के

निर्यात चीनला झाली होती. तसेच, अमेरिकेचे कृषी खाते अर्थात यूएसडीएने ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन १३ कोटी १५ लाख टन इतके होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा ‘ला नीना’च्या प्रभावामुळे ब्राझीलमध्ये कोरडे हवामान

असल्याने सोयाबीन लागवडीला सहा आठवड्यांनी उशीर झाला होता. त्यामुळे काढणीलाही उशीर होणार आहे. चीनने मोठ्या प्रमाणात ब्राझीलकडून सोयाबीन खरेदी केले आहे. त्यामुळे ब्राझीलमधील सोयाबीन साठे आजवरच्या नीचांकी पातळीवर आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या

अंदाजानुसार, कोरोनाची दुसरी लाट आली असूनही, जागतिक पातळीवर मांसापासून निर्मित पदार्थांची मागणी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सोयाबीनची मागणीही कायम राहील. गाळप झाल्यानंतर सोयाबीनची पेंड पशुखाद्य म्हणून वापरण्यात येते.

‘ला निना’च्या प्रभावामुळे उत्पादनात घट अमेरिकेतही यंदा सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. अमेरिका, ब्राझील, आणि अर्जेंटिना हे सोयाबीनचे सर्वात मोठे उत्पादक देश आहेत. ‘ला निना’मुळे या तीनही देशांमधील सोयाबीन उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या जागतिक किमती विक्रमी पातळीवर आहेत. त्याचा फायदा भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे.

जागतिक सोयाबीन उत्पादनावर दृष्टिक्षेप

  •   ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात होणार घट
  •   ब्राझीलचे सोयाबीन साठे नीचांकी पातळीवर 
  •   कोरड्या हवामानामुळे सोयाबीन पट्ट्यात 
  • उत्पादनाला फटका
  •    चीनच्या सततच्या मागणीचा किमतींवर दबाव  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com