Agriculture news in marathi Soybean production declines in Brazil after US | Page 4 ||| Agrowon

अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनात घट

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जानेवारी 2021

यंदा, ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात ७ लाख ६० हजार टन इतकी घट अपेक्षीत आहे, असा अंदाज तेथील सरकारी कृषी कंपनी कॉनॅबने वर्तवला आहे. 

पुणे ः प्रतिकूल हवामानामुळे  ब्राझीलमध्ये चालू हंगामात सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. लागवड क्षेत्रात वाढ झाली असूनही उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. यंदा, ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात ७ लाख ६० हजार टन इतकी घट अपेक्षीत आहे, असा अंदाज तेथील सरकारी कृषी कंपनी कॉनॅबने वर्तवला आहे. 

जानेवारीच्या अंदाजानुसार ब्राझीलमधील अपेक्षीत सोयाबीन उत्पादन १३ कोटी ३७ लाख टन इतके आहे, तर मागील महिन्यातील अंदाजानुसार ते १३ कोटी ४४ लाख टन इतके होते. असे असले तरी लागवड क्षेत्रात मात्र वाढ अपेक्षीत आहे. २०२०-२१च्या हंगामात, ब्राझीलमधील

सोयाबीनचे लागवड क्षेत्र जवळपास ३८२ लाख हेक्टर इतके होण्याचा अंदाज असून, त्यात १७ हजार हेक्टरची वाढ अपेक्षित आहे. उत्पादकतेत घट झाली असल्याने लागवड क्षेत्रात वाढ होऊन सुद्धा उत्पादनात घट होणार आहे.

उत्पादनात घट होणार असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात सात टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. 
गेल्या वर्षी, ब्राझीलने सोयाबीन निर्यातीत तब्बल ३४ टक्क्यांची वाढ नोंदवली असून, ७५० लाख टन सोयाबीन परदेशात रवाना झाले होते. एकूण निर्यातीपैकी ७३ टक्के

निर्यात चीनला झाली होती. तसेच, अमेरिकेचे कृषी खाते अर्थात यूएसडीएने ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन १३ कोटी १५ लाख टन इतके होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा ‘ला नीना’च्या प्रभावामुळे ब्राझीलमध्ये कोरडे हवामान

असल्याने सोयाबीन लागवडीला सहा आठवड्यांनी उशीर झाला होता. त्यामुळे काढणीलाही उशीर होणार आहे. चीनने मोठ्या प्रमाणात ब्राझीलकडून सोयाबीन खरेदी केले आहे. त्यामुळे ब्राझीलमधील सोयाबीन साठे आजवरच्या नीचांकी पातळीवर आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या

अंदाजानुसार, कोरोनाची दुसरी लाट आली असूनही, जागतिक पातळीवर मांसापासून निर्मित पदार्थांची मागणी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सोयाबीनची मागणीही कायम राहील. गाळप झाल्यानंतर सोयाबीनची पेंड पशुखाद्य म्हणून वापरण्यात येते.

‘ला निना’च्या प्रभावामुळे उत्पादनात घट
अमेरिकेतही यंदा सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. अमेरिका, ब्राझील, आणि अर्जेंटिना हे सोयाबीनचे सर्वात मोठे उत्पादक देश आहेत. ‘ला निना’मुळे या तीनही देशांमधील सोयाबीन उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या जागतिक किमती विक्रमी पातळीवर आहेत. त्याचा फायदा भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे.

जागतिक सोयाबीन उत्पादनावर दृष्टिक्षेप

  •   ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात होणार घट
  •   ब्राझीलचे सोयाबीन साठे नीचांकी पातळीवर 
  •  
  •   कोरड्या हवामानामुळे सोयाबीन पट्ट्यात 
  • उत्पादनाला फटका
  •    चीनच्या सततच्या मागणीचा किमतींवर दबाव
     

इतर अॅग्रोमनी
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...