agriculture news in Marathi soybean production decreased in America Maharashtra | Agrowon

अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादनात घटीचा अंदाज आहे. मिनेसोटा, लोवा आणि कनसास या प्रांतात सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे.

वॉशिंग्टन ः अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादनात घटीचा अंदाज आहे. मिनेसोटा, लोवा आणि कनसास या प्रांतात सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन ३५ दशलक्ष बुशेल्सने घटून ४ हजार १३५ बुशेल्स होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत ८२.३ दशलक्ष हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) जाहीर केलेल्या अहवालातून मिळाली. 

अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादकता ५०.२ बुशेल्स प्रतिहेक्टर राहण्याची शक्यता आहे. देशात सोयाबीन गाळप ५ दशलक्ष बुशेल्सने वाढून २ हजार २०० बुशेल्स होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्जेंटिनात पिकाला फटका बसल्याने यंदा अमेरिकेतून सोयामिल निर्यात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निर्यात यंदा २ हजार २३० बुशेल्स होण्याचा अंदाज आहे. उत्पादनात घट होणार असल्याने तसेच देशांतर्गत सोयाबीनचा वापर वाढीचा अंदाज आणि निर्यातवाढ होणार असल्याने साठा १४० दशलक्ष बुशेल्स राहण्याची शक्यता आहे, ‘यूएसडीए’ने अहवालात म्हटले आहे. 

सोयाबीन तेजीत
जानेवारीत सोयाबीन आणि सोयाबीन उत्पादनांचा दर डिसेंबरच्या तुलनेत जास्त राहण्याचा अंदाज आहे. २०२०-२१ च्या हंगामात सोयाबीनचा सरासरी दर हा ११.१५ बुशेल्स राहण्याची शक्यता आहे. हा दर गेल्या सहा वर्षांतील उच्चांकी आहे. सोयामिलचा दर हा ३९० डॉलर प्रतिशॉर्ट टन राहण्याचा अंदाज आहे. हा दर २० डॉलरने अधिक आहे. तर सोयाबीन तेलाचा दर ३८.५ सेंट प्रतिपाउंड राहील, असे अहवालात म्हटले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर काहीसे कमी झाले असतानाही १३८५ डॉलर प्रतिबुशेल्सवर आहेत.   

जागतिक उत्पादनातही घट
तेलबियांमध्ये यंदा सूर्यफूल उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. तर सोयाबीन, सरकी, शेंगदाणा, मोहरी आणि पाम उत्पादनात घटीची शक्यता आहे. रशियात सूर्यफूल उत्पादनात ५ लाख टनांनी वाढ झाली आहे. सोयाबीन उत्पादनात मात्र मोठी घट पाहायला मिळत आहे. अर्जेंटिनात उत्पादन २ दशलक्ष टन ते ४८ दशलक्ष टनांनी घट होईल, उरुग्वेमध्ये २ लाख टन ते २.२ दशलक्ष टनांनी घट होईल. या दोन्ही देशांमध्ये डिसेंबर महिन्यात आणि जानेवारीत सुरुवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे येथे सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे. जागतिक सोयाबीन साठा ८४.३ दशलक्ष टनांवर असण्याची शक्यता ‘यूएसडीए’ने व्यक्त केली आहे. 

चीनमध्ये वाढीची शक्यता
दक्षिण अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात २.१ दशलक्ष टनांनी घट होण्याची शक्यता आहे. मात्र चीनमध्ये उत्पादनात १९.६ दशलक्ष टनांनी उत्पादन वाढ शक्य आहे. चीनने यंदा सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी खरेदी केली आहे. तसेच सोयाबीन उत्पादक पट्ट्यात अनुकूल वातावरणामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर अमेरिका आणि अर्जेंटिनात सोयाबीन साठा कमी आहे. तर चीनमध्ये सध्या जगात सर्वाधिक सोयाबीन साठा आहे.


इतर अॅग्रोमनी
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...
प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...
बाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...
द्राक्ष वाइन उत्पादनात ३५ टक्के घट शक्य नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाइन उत्पादकांनी...
शेतमाल बाजारातील सुधारणा कायम राहीलवॉशिंग्टन ः शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय बाजार यंदा...
अर्जेंटिनात महागाई भडकलीब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर...