खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना अल्प उत्पादन

खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी झाली. पीकही जोमात होते. परंतु सप्टेंबरमधील अतिपावसात पिकाचे नुकसान झाले असून, उत्पादन एकरी एक ते दीड क्विंटल एवढेच आले आहे. काही शेतकऱ्यांना अपवादाने अधिकचे उत्पादन हाती आले आहे.
Soybean production in Khandesh is low for many farmers
Soybean production in Khandesh is low for many farmers

जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी झाली. पीकही जोमात होते. परंतु सप्टेंबरमधील अतिपावसात पिकाचे नुकसान झाले असून, उत्पादन एकरी एक ते दीड क्विंटल एवढेच आले आहे. काही शेतकऱ्यांना अपवादाने अधिकचे उत्पादन हाती आले आहे.

पेरणी जळगाव जिल्ह्यात जळगाव, यावल, चोपडा, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात अधिक झाली होती. पेरणी सुमारे ३१ हजार हेक्टरवर झाली होती. जळगाव जिल्ह्यात सुमारे २४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. हजायाच भागात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीदेखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान  झाले आहे. सोयाबीनला मशागत, बियाणे, आंतरमशागत, खते, तणनियंत्रण, कापणी, मळणी यासाठी एकरी १० ते ११ हजार रुपये खर्च आला. पण उत्पादन फक्त एक ते दीड क्विंटल आल्याने हा खर्चही निघेनासा झाला आहे.

सध्या सोयाबीनला दर ३२०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. शासकीय खरेदी सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. दर कमी मिळत असल्याने मोठा फटका बसला आहे. मळणीचे दर काही भागात ३०० रुपये प्रतिक्विंटल तर काही भागात यापेक्षा अधिक आहेत. मळणीसाठी वेळेत हार्वेस्टर, ट्रॅक्टरचलित यंत्रणादेखील उपलब्ध होत नव्हती. यातच पावसाळी वातावरण गेल्या महिन्यात सतत तयार होत होते.

अशात शेतकऱ्यांना कापणी करून गोळा केलेला सोयाबीन ताडपत्री, प्लास्टिक पेपरने झाकून ठेवावे लागत होते. सोयाबीनची मळणी झाल्यानंतर त्यात रब्बी पिके पेरणीचे नियोजन केले जात आहे. या रिकाम्या क्षेत्रात कोरडवाहू पिके पेरणी अशक्य झाले आहे. कारण काळ्या कसदार जमिनी अतिउष्णतेत कडक झाल्या आहेत. त्यात बैलजोडीणे पूर्वमशागत व पेरणी  करता येत नसल्याचे सांगण्यात आले.

सोयाबीनचे उत्पादन यंदा एकरी दीड क्विंटलच आले आहे. दर स्थिर आहेत. पण उत्पादन कमी आल्याने पीक परवडलेले नाही. - गयभू पाटील, शेतकरी, शिरपूर, जि. धुळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com