Agriculture news in marathi Soybean production likely to decline in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन काढण्याचे नियोजन करु लागले आहेत.

सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन काढण्याचे नियोजन करु लागले आहेत. पलूस, वाळवा, कडेगाव तालुक्यातील शेतकरी सोयाबीन काढून मळणीची तयारी करीत आहेत. सततच्या पावसाने सोयाबीनच्या एकरी उत्पादनात १५ ते २०  टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सुमारे ४५ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. गतवर्षीपेक्षा चालुवर्षी सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात ३ ते ४ हजार हेक्टरने घट झाली होती. मुळात पलूस तालुक्यात सोयाबीनची आगाप पेरणी केली जाते. यंदाच्या हंगामात पावसाला उशीरा सुरवात झाली होती. त्यामुळे सोयाबीन पेरणीस विलंब झाला. त्यानंतर अधून मधून पाऊस पडत होता. हा पाऊस पिकास उपयुक्त ठरत असल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. 

दरम्यान, पावसाचा खंड आणि अधून मधून पडणारा हलका पाऊस यामुळे सोयाबीनवर पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकरी धास्तावला होता. पिकास पोषक वातावरण असल्याने सोयाबीन चांगले बहरले होते. त्यातच सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाला सुरवात झाली. त्यामुळे काढणी आलेले सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यातूनही शेतकऱ्यांनी पीक काढून मळणी करण्यास सुरवात केली होती. परंतु, सातत्याने सुरु असलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी थांबवली होती. सध्या शेतकरी सोयाबीन काढणीसाठीचे नियोजन करु लागले 
आहेत. 

काढणीचा दर वाढला

जिल्ह्यात गतवर्षी सोयाबीन काढणीसाठी एकरी ३००० रुपये असा दर होता. यंदा एकाच वेळी सोयाबीनची काढणी आल्याने शेतकरी मजूरांची शोधा शोध करु लागला आहे. त्यामुळे सोयाबीन काढणीच्या दरात एकरी ५०० रुपयांची वाढ झाली असून एकरी ३५०० रुपये असा दर आहे. 

उत्पादनात घट होण्याची शक्यता

पाऊस थांबून पाच दिवस झाले. अजूनही सखल भागातील सोयाबीनच्या शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यातच काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादनात १५ ते २० टक्के घट होण्याचा अंदाज आहे.

पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनची काढणी सुरु केली आहे. परंतू या पावसाने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 
- तात्यासो नागावे, खटाव, ता. पलूस


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...