परभणी जिल्ह्यात सोयाबीनची १६ क्विंटल उत्पादकता प्रस्तावित

परभणी ः जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपातील सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात चार हजार हेक्टरने वाढ होईल. २ लाख ४२ हजार हेक्टरवर पेरणी, तर प्रतिहेक्टरी २.६० क्विंटलने वाढ गृहित धरुन १६ क्विंटल उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे.
Soybean productivity of 16 quintals is proposed in Parbhani district
Soybean productivity of 16 quintals is proposed in Parbhani district

परभणी ः जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपातील सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात चार हजार हेक्टरने वाढ होईल. २ लाख ४२ हजार हेक्टरवर पेरणी, तर प्रतिहेक्टरी २.६० क्विंटलने वाढ गृहित धरुन १६ क्विंटल उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली  आहे. कपाशी, तूर, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांच्या उत्पादकतेत सुद्धा वाढ अपेक्षित आहे.

उत्पादकतावाढीसाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. या वर्षी जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या प्रमुख खरीप पिकांची पेरणी ५ लाख २२ हजार १०० हेक्टरवर नियोजित आहे. या सर्व पिकांच्या उत्पादकतेत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. 

सोयाबीनचे २०१५ ते २०१९ या पाच वर्षातील सरासरी क्षेत्र २ लाख २४ हजार २८८ हेक्टर राहिले. तर प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ८.५९ क्विंटल होती. गतवर्षी सोयाबीनची २ लाख ३७ हजार ९७७ हेक्टरवर पेरणी झाली होती. तर प्रतिहेक्टरी उत्पादकता १३.४० क्विंटल आली होती. यंदा कपाशीची १ लाख ९७ हजार हेक्टरवर लागवड, तर ३.५ क्विटंल उत्पादकता प्रस्तावित आहे.

तुरीची ४६ हजार २५० हेक्टरवर पेरणी, तर प्रतिहेक्टरी उत्पादकता ९ क्विंटल, मुगाची २४ हजार हेक्टरवर पेरणी, तर प्रतिहेक्टरी उत्पादकता ७.५० क्विंटल, उडदाची ८ हजार हेक्टरवर पेरणी, तर उत्पादकता ६.५ क्विंटल, ज्वारीची ४ हजार २५० हेक्टरवर पेरणी, तर उत्पादकता ६ क्विंटल, बाजरीची ६०० हेक्टरवर पेरणी, तर ६.५० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादकता प्रस्तावित केली आहे. 

उत्पादकता वाढीसाठी माती परिक्षणानुसार खतांच्या संतुलित मात्रा देणे, पिकांचा फेरपालट, जिवाणू संवर्धके, बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करून पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी ‘रुंद, वंरबा, सरी’ पध्दतीचा अंगीकार, उताराला आडवी पेरणी करून त्यामध्ये सऱ्या मारुन मुलस्थानी जलसंधारण, पावसाच्या खंडकाळात संरक्षित सिंचन आदी बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com