agriculture news in marathi Soybean productivity of 16 quintals is proposed in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात सोयाबीनची १६ क्विंटल उत्पादकता प्रस्तावित

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जून 2021

परभणी ः जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपातील सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात चार हजार हेक्टरने वाढ होईल. २ लाख ४२ हजार हेक्टरवर पेरणी, तर प्रतिहेक्टरी २.६० क्विंटलने वाढ गृहित धरुन १६ क्विंटल उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली  आहे.

परभणी ः जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपातील सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात चार हजार हेक्टरने वाढ होईल. २ लाख ४२ हजार हेक्टरवर पेरणी, तर प्रतिहेक्टरी २.६० क्विंटलने वाढ गृहित धरुन १६ क्विंटल उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली  आहे.
कपाशी, तूर, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांच्या उत्पादकतेत सुद्धा वाढ अपेक्षित आहे.

उत्पादकतावाढीसाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. या वर्षी जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या प्रमुख खरीप पिकांची पेरणी ५ लाख २२ हजार १०० हेक्टरवर नियोजित आहे. या सर्व पिकांच्या उत्पादकतेत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. 

सोयाबीनचे २०१५ ते २०१९ या पाच वर्षातील सरासरी क्षेत्र २ लाख २४ हजार २८८ हेक्टर राहिले. तर प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ८.५९ क्विंटल होती. गतवर्षी सोयाबीनची २ लाख ३७ हजार ९७७ हेक्टरवर पेरणी झाली होती. तर प्रतिहेक्टरी उत्पादकता १३.४० क्विंटल आली होती. यंदा कपाशीची १ लाख ९७ हजार हेक्टरवर लागवड, तर ३.५ क्विटंल उत्पादकता प्रस्तावित आहे.

तुरीची ४६ हजार २५० हेक्टरवर पेरणी, तर प्रतिहेक्टरी उत्पादकता ९ क्विंटल, मुगाची २४ हजार हेक्टरवर पेरणी, तर प्रतिहेक्टरी उत्पादकता ७.५० क्विंटल, उडदाची ८ हजार हेक्टरवर पेरणी, तर उत्पादकता ६.५ क्विंटल, ज्वारीची ४ हजार २५० हेक्टरवर पेरणी, तर उत्पादकता ६ क्विंटल, बाजरीची ६०० हेक्टरवर पेरणी, तर ६.५० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादकता प्रस्तावित केली आहे. 

उत्पादकता वाढीसाठी माती परिक्षणानुसार खतांच्या संतुलित मात्रा देणे, पिकांचा फेरपालट, जिवाणू संवर्धके, बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करून पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी ‘रुंद, वंरबा, सरी’ पध्दतीचा अंगीकार, उताराला आडवी पेरणी करून त्यामध्ये सऱ्या मारुन मुलस्थानी जलसंधारण, पावसाच्या खंडकाळात संरक्षित सिंचन आदी बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...