नागपूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी ३५७ किलो

नागपूर जिल्ह्यातमागील वर्षीच्या तुलनेत फक्त २२ टक्केच उत्पादन आले आहे. प्रयोगाच्या आकडेवारीनुसार वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पन्न हेक्टरी ३५७.२७५ किलो ग्रॅम आहे.
नागपूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी ३५७ किलो
नागपूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी ३५७ किलो

नागपूर : अतिवृष्टी व खोडमाशीने यंदा सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान केले. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे समोर आले होते. पीककापणी प्रयोगाने यावर शिक्कमोर्तब केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत फक्त २२ टक्केच उत्पादन आले आहे. प्रयोगाच्या आकडेवारीनुसार वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पन्न हेक्टरी ३५७.२७५ किलो ग्रॅम आहे.

दुबार पीक घ्यायचे असल्याने यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनला प्राधान्य दिले. परंतु त्यांच्या हातात चांगले उत्पादन येण्याऐवजी नुकसानच झाले. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी झाली. नद्यांना पूर आला. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला. पावसानंतर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे संपूर्ण पानेच पिवळी पडली. सोयाबीनचे झाडे मृत झाली. शेंगाही आल्या नाही. ज्या आल्यात, त्यात दानाच भरला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनच्या पिकावर ट्रॅक्टर, रोटावेटर चालवले.

नागपूर जिल्ह्यात संपूर्ण सोयाबीनचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आले. त्यामुळे त्यांना नुकसानीकरिता मदत देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला. नुकतेच कृषी विभागाकडून पीककापणी प्रयोगाचे काम पूर्ण झाले. प्रयोगाच्या आकडेवारीनुसार वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पन्न हेक्टरी ३५७.२७५ किलो ग्रॅम आहे. वर्ष २०१९-२० मध्ये हेक्टरी उत्पन्न १६४०.२०७ किलोग्रॅम होते. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्न २२ टक्केच्या जवळपास आहे.

तालुका ----------उत्पन्न प्रति हेक्टर कि.ग्रॅ. नागपूर ग्रा. ------ १२१.७५० सावनेर ---------- ११२.४६४ कामठी ---------- २१२.३३३ हिंगणा ----------- २१२.३३३ पारशिवनी ------- १२१.१६७ मौदा ------------- ३०५.४४२ काटोल ---------- ३११.८०६ नरखेड ---------- ४१९.००० कळमेश्‍वर ------ १८७.४१७ उमरेड -----------  ४३५.८३३ भिवापूर --------- ९६८.४५८ कुही ------------- ७९४.६९४ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com