अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते ३५६५ रुपये 

अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते ३५६५ रुपये 
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते ३५६५ रुपये 

अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सोयाबीनचा कमीत कमी दर ३२०० ते जास्तीत जास्त ३५६५ असा मिळत आहे. गेल्या काही दिवसांत हे दर सुधारले असून, ही वाढ आणखी काही दिवस टिकण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. सोयाबीनची आवक दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक होत आहे.

अकोला बाजारात सोयाबीनची आवक गेल्या काही काळापासून स्थिर आहे. मंगळवारी (ता. १५) येथील बाजारात २३४० क्विंटल आवक झाली होती. तुरीची ४३०० ते ५३५० रुपये क्विंटल दराने विक्री झाली. नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. दर दिवसाला तूर वाढत आहे. मंगळवारी १९६० क्विंटल आवक झाली होती.

बाजार समितीत मूग, उडदाची आवक कमी होत चालली आहे. उडदाची १९० क्विंटल आवक झाली होती. उडदाचा दर ४२०० ते ४९०० दरम्यान तर मुगाचा दर कमीत कमी ४५०० व जास्तीत जास्त ५८०० होता. हरभऱ्याची अावक सुरू झाली आहे. हरभरा ४००० ते ५००० असा होता. सरासरी ४५०० रुपये दर भेटला. संक्रांतीमुळे तीळ ९१०० ते १२००० रुपये मिळाला. आवक मात्र २ क्विंटल होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com