नांदेडमध्ये सोयाबीन प्रतिक्विंटल २९०० ते ३१२१ रुपये

नांदेडमध्ये सोयाबीन प्रतिक्विंटल २९०० ते ३१२१ रुपये
नांदेडमध्ये सोयाबीन प्रतिक्विंटल २९०० ते ३१२१ रुपये

नांदेड ः नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. २७) सोयाबीनची १०९ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल २९०० ते ३१२१ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हळद (कांडी)ची ४४४ क्विंटल आवक झाली होती. हळद (कांडी) ला प्रतिक्विंटल ५८०० ते ६१९० रुपये दर मिळाले. हळद (गोळा) ची ८४ क्विंटल आवक झाली होती. हळद (गोळा)ला प्रतिक्विंटल ५८०१ ते ६५५० रुपये दर मिळाले. हळद (तुकडा)ची १६ क्विंटल आवक झाली होती. हळद (तुकडा)ला प्रतिक्विंटल ५२४५ ते ६००० रुपये दर मिळाले. ज्वारीची ४ क्विंटल आवक झाली होती. ज्वारीला प्रतिक्विंटल ११०० रुपये दर मिळाले. गव्हाची २४ क्विंटल आवक झाली होती. गव्हाला प्रतिक्विंटल १८०० ते १८११ रुपये दर मिळाले.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २७) मुगाची (चमकी) २ क्विंटल आवक झाली होती. मुगाची (चमकी) प्रतिक्विंटल ४२०० रुपये दर मिळाला. मूग (मोगलाई) ३७ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ३६५० ते ४५०१ रुपये दर मिळाले. तूर (लाल)ची ६ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ३४८० रुपये दर मिळाला.

तूर (पांढरी)ची २ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ३४०० रुपये दर मिळाला. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मूग, उडिद, सोयाबीनची आवक सुरू आहे. गुरुवारी (ता. २७) मुगची ६० क्विंटल आवक झाली होती. मुगाला प्रतिक्विंटल ४१०० ते ४८५० रुपये दर मिळाले. उडदाची १११ क्विंटल आवक झाली होती. उडदाला प्रतिक्विंटल ३६०० ते ४१२५ रुपये दर मिळाले. सोयाबीनची ६३५ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल २९०५ ते ३२५० रुपये दर मिळाले. ज्वारी (टाळकी)ची ६ क्विंटल आवक झाली होती.ज्वारीला प्रतिक्विंटल १८७५ रुपये दर मिळाले. गव्हाची ५६ क्विंटल आवक झाली होती. गव्हाला प्रतिक्विंटल १६६५ ते १८९० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com