agriculture news in Marathi soybean rate up due to high rate and more fail ration Maharashtra | Agrowon

जादा खरेदी दर, नापासच्या अधिक प्रमाणामुळे सोयाबीन बियाणे दरवाढ 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित बियाण्याचे दर वाढविल्याने राज्यभर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झालेली आहे.

अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित बियाण्याचे दर वाढविल्याने राज्यभर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झालेली आहे. बियाण्यांची ही दरवाढ गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उगवण क्षमतेत झालेली घट, बीजोत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बियाण्याची वाढलेली किंमत व उगवण क्षमतेच्या निकषानुसार नापास झालेल्या बियाण्याची आलेली घट या कारणांमुळे झाली असल्याचा दावा महाबीजच्या करण्यात आला आहे. 

याबाबत महाबीजने म्हटले की, सोयाबीन बियाणे विक्रीमध्ये महाबीजचा जवळपास ४५ टक्के वाटा आहे. चांगले बियाणे शेतकऱ्यांना रास्तभावात मिळवून देण्यासाठी सदैव कसोशीने प्रयत्‍न केले जातात. सन २०१९-२० मध्ये राबविलेल्या सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमामध्ये पीक परिपक्वता अवस्थेत असताना महाराष्ट्र, मध्यप्रदेशात जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीन बियाण्याच्या उगवण शक्तीवर विपरीत परिणाम झाला.

परिणाम या खरीप हंगामामध्ये सोयाबीन प्रमाणित बियाण्यांची तुटवडा सदृश परिस्थिती निर्माण झाली. बियाणे मागणीची पूर्तता करण्यासाठी महाबीजव्दारे वेळोवेळी निविदा जाहीर करून तसेच पॅकिंग करून बियाणे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. 

सोयाबीन बिजोत्पादन खरेदी धोरणाप्रमाणे जिल्हानिहाय निवडक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माहे डिसेंबर२०१९ ते जानेवारी २०२० चे सरासरी दर अधिक प्रोत्साहनपर रक्कम या दराने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आले. या कालावधीत बाजारात कमी माल आल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत दर ४४०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान होते. गेल्या खरीप हंगामात महाबीज सोयाबीन जेएस ३३५ बियाण्यांची विक्री किंमत प्रति बॅग १८६० रुपये होती. या खरीप हंगामात २२५० रुपये प्रति बॅग झाली. म्हणजे एकूण वाढ ३९० प्रति बॅग एवढी आहे. ही वाढ जवळपास २१ टक्के आहे. 

खर्चात वाढ 
बिजोत्पादकांकडून कच्चे बियाणे २१.५ टक्के वाढलेल्या दरात घेण्यात आले. या कच्च्या बियाण्यांतून प्रक्रिया करताना तसेच उगवण क्षमता चाचणीमध्ये नापास बियाण्याची घट येते. या शिवाय बियाण्याची प्रक्रिया, पॅकिंग, चाचणी इत्यादी तसेच नापास बियाण्याचा खर्च प्रमाणित बियाण्यांच्या किमतीमध्ये समाविष्ट केला जातो. मागील वर्षी परिपक्वतेच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे नापास बियाण्याचे प्रमाण या वर्षी खुपच अधिक होते. या बाबींचा विचार करता बाजारातील वाढलेले दर, नापास बियाण्याचे अधिक प्रमाण, तुटवडा सदृश परिस्थिती इत्यादी कारणांमुळे महाबीजच्या सोयाबीन बियाण्यामध्ये माफक प्रमाणात दर वाढ झालेली आहे, असे महाबीजच्या विपणन महाव्यवस्थापकांनी दिली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागुपरात तुरीच्या दरातील तेजी कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...