सोयाबीनमधील तेजी कायम 

देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यातच जगात कोरोनाचा कहर सुरूच असल्याने आयात- निर्यातीवर परिणाम झाला आहे.
soybean
soybean

पुणे ः देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यातच जगात कोरोनाचा कहर सुरूच असल्याने आयात- निर्यातीवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सट्टेबाज प्रयत्न करत असून, बाजार आणखी तेजीत येण्याची वाट पाहत आहेत. दर आणखी वाढतील या अपेक्षेने साठेबाजही बाजारात कमी माल आणत आहेत. परिणामी सोयातेल, सोयापेंडचे दरही वाढले आहेत.  देशात कोरोनाचा कहर वाढल्याने सोयाबीनसाठी महत्त्वाच्या बाजार समित्या बंद आहेत किंवा कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यातच देशात उत्पादन कमी झाले आणि जागतिक पातळीवरही सोयाबीनचा तुटवडा जाणवत असल्याने दराने उसळी घेतली. वायदे बाजारातही सोयाबीन भाव खात आहे. या स्थितीत सट्टेबाज बाजार सक्रिय असून, दर आणखी कसे वाढतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या शेतकऱ्यांकडे कमी सोयाबीन उपलब्ध असले तरी ते बाजारात विक्रीसाठी आणण्याऐवजी पेरणीसाठी बियाणे म्हणून वापरतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल आता बाजारात नगण्य येईल, असे जाणकारांनी सांगितले. यापुढे बाजारात येणारा माल हा साठेबाजांचा असेल आणि या परिस्थितीचा ते फायदा घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत, असेही जाणकार म्हणाले.  गेल्या आठवडाभरात सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल पुन्हा ४०० ते ६०० रुपयांची तेजी आली. सोयाबीनचे सरासरी दर हे ७००० ते ७७०० रुपयांच्या दरम्यान राहिले. तर प्लांट रेटही वाढलेले आहेत. मागील आठवड्यात सोयाबीनचे प्लांट रेट ८००० रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते. चालू आठवड्यातही सोयाबीनचे प्लांट रेट हे ७६०० ते ८००० हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. 

साठेबाजांना दरवाढीची आशा  शेतकऱ्यांकडील सोयाबीन बाजारात येण्याची शक्यता कमी आहे. त्यातच कोरोनामुळे आयात-निर्यात प्रभावित झाल्याने बाजारात बाहेरून माल येण्याची शक्यता नाही. याचा पूर्ण फायदा साठेबाज घेत असून, दर आणखी वाढण्यासाठी कमी माल बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. नवीन माल बाजारात येईपर्यंत सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे या काळात साठेबाजांच्या व्यवहारांवरच बाजार अवलंबून राहणार आहे.  सोयातेलही तेजीत  जागतिक बाजारात सोयातेल सध्या चांगलाच भाव खात आहे. भारत तेल आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने जागतिक दरवाढीचा परिणाम देशातही होत आहे. त्यातच कोरोनामुळे आयातीवर परिणाम झाला असून, बंद असल्याच्या स्थितीत आहे. त्याचाही परिणाम दरावर झाला आहे. मागील आठवडाभरात सोयातेलाचे दर ४० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. मध्य प्रदेशात दहा किलो तेलाचे भाव १४७० ते १४९० रुपये, महाराष्ट्रात १४३० ते १५०० रुपये आणि राजस्थानमध्ये १४८० रुपयांच्या दरम्यान राहिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com