agriculture news in Marathi soybean rate high on less arrival Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सोयाबीनमधील तेजी कायम 

अनिल जाधव
शुक्रवार, 14 मे 2021

देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यातच जगात कोरोनाचा कहर सुरूच असल्याने आयात- निर्यातीवर परिणाम झाला आहे.

पुणे ः देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यातच जगात कोरोनाचा कहर सुरूच असल्याने आयात- निर्यातीवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सट्टेबाज प्रयत्न करत असून, बाजार आणखी तेजीत येण्याची वाट पाहत आहेत. दर आणखी वाढतील या अपेक्षेने साठेबाजही बाजारात कमी माल आणत आहेत. परिणामी सोयातेल, सोयापेंडचे दरही वाढले आहेत. 

देशात कोरोनाचा कहर वाढल्याने सोयाबीनसाठी महत्त्वाच्या बाजार समित्या बंद आहेत किंवा कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यातच देशात उत्पादन कमी झाले आणि जागतिक पातळीवरही सोयाबीनचा तुटवडा जाणवत असल्याने दराने उसळी घेतली. वायदे बाजारातही सोयाबीन भाव खात आहे. या स्थितीत सट्टेबाज बाजार सक्रिय असून, दर आणखी कसे वाढतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सध्या शेतकऱ्यांकडे कमी सोयाबीन उपलब्ध असले तरी ते बाजारात विक्रीसाठी आणण्याऐवजी पेरणीसाठी बियाणे म्हणून वापरतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल आता बाजारात नगण्य येईल, असे जाणकारांनी सांगितले. यापुढे बाजारात येणारा माल हा साठेबाजांचा असेल आणि या परिस्थितीचा ते फायदा घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत, असेही जाणकार म्हणाले. 

गेल्या आठवडाभरात सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल पुन्हा ४०० ते ६०० रुपयांची तेजी आली. सोयाबीनचे सरासरी दर हे ७००० ते ७७०० रुपयांच्या दरम्यान राहिले. तर प्लांट रेटही वाढलेले आहेत. मागील आठवड्यात सोयाबीनचे प्लांट रेट ८००० रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते. चालू आठवड्यातही सोयाबीनचे प्लांट रेट हे ७६०० ते ८००० हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. 

साठेबाजांना दरवाढीची आशा 
शेतकऱ्यांकडील सोयाबीन बाजारात येण्याची शक्यता कमी आहे. त्यातच कोरोनामुळे आयात-निर्यात प्रभावित झाल्याने बाजारात बाहेरून माल येण्याची शक्यता नाही. याचा पूर्ण फायदा साठेबाज घेत असून, दर आणखी वाढण्यासाठी कमी माल बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. नवीन माल बाजारात येईपर्यंत सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे या काळात साठेबाजांच्या व्यवहारांवरच बाजार अवलंबून राहणार आहे. 

सोयातेलही तेजीत 
जागतिक बाजारात सोयातेल सध्या चांगलाच भाव खात आहे. भारत तेल आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने जागतिक दरवाढीचा परिणाम देशातही होत आहे. त्यातच कोरोनामुळे आयातीवर परिणाम झाला असून, बंद असल्याच्या स्थितीत आहे. त्याचाही परिणाम दरावर झाला आहे. मागील आठवडाभरात सोयातेलाचे दर ४० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. मध्य प्रदेशात दहा किलो तेलाचे भाव १४७० ते १४९० रुपये, महाराष्ट्रात १४३० ते १५०० रुपये आणि राजस्थानमध्ये १४८० रुपयांच्या दरम्यान राहिले. 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...