agriculture news in Marathi, soybean rates at 2850 to 2950 rupees in Nagpur, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नागपुरात सोयाबीन २८५० ते २९५० रुपये
विनोद इंगोले
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

वाशीम जिल्हा हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे. सोयाबीनचे दर मधल्या काळात खाली आले होते. २३०० रुपये प्रति क्‍विंटलने सोयाबीन विकले गेले. आता काहीशी तेजी सोयाबीन उत्पादक अनुभवत आहेत. २९५० रुपयांपर्यंत सोयाबीन पोचल्याने ते येत्या काळात ३ हजार रुपये प्रति क्‍विंटलवर पोचेल, असे वाटते.
- डॉ. गजानन ढवळे, शेतकरी, शिरपूर जैन, जि. वाशीम

नागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍विंटल असलेल्या सोयाबीनमध्ये तेजी आली आहे. गेल्या सप्ताहात सोयाबीन २८५० ते २९५० रुपये प्रति क्‍विंटलवर पोचले. सोयाबीनची आवक कमी झाल्याने येत्या काळात सोयाबीन दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सोयाबीनची आवक वाढती असल्याने बाजारात दर खाली आले होते. सोयाबीन अवघे २३०० रुपयांपासून विकले गेले. गेल्या आठवड्यात मात्र सोयाबीनची आवक मंदावली. परिणामी सोयाबीन दरातही तेजीचा अनुभव शेतकरी घेत आहेत. सोयाबीन २९५० रुपयांपर्यंत पोचले असून, यामध्ये आणखी तेजीचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. २६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनची ३२९३ क्‍विंटल आवक झाली. २६०० ते २८५० रुपये प्रति क्‍विंटल दराने सोयाबीनचे व्यवहार झाले.

२७ नोव्हेंबर रोजी आवक साडेचार हजार क्‍विंटलवर पोचली आणि दर स्थिर होते. २४ नोव्हेंबर रोजी आवक अर्ध्यावर म्हणजेच २ हजार क्‍विंटलवर पोचली आणि दरात सुधारणा झाली. २९०० रुपये प्रति क्‍विंटलवर दर पोचले. २८ नोव्हेंबर रोजी २९११ रुपये क्‍विंटलचे दर शेतकऱ्यांना मिळाले. दरातील तेजीमागे आवक कमी होणे हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. 

या आठवड्यात सोयाबीनचे व्यवहार २९५० रुपये प्रति क्‍विंटलने होत आहेत. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांची आवक १२०० क्‍विंटल असून २५०० ते ३१०० रुपये प्रती क्‍विंटने व्यवहार होत आहेत. गेल्या आठवडाभरापासून संत्रा स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांनाही मागणी आहे. परिणामी, याचेही दर गेल्या आठवडाभरापासून स्थिर आहेत. २७०० ते ३२०० रुपये प्रती क्‍विंटलने मोसंबीचे व्यवहार होत असून ८०० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. बटाट्याची सरासरी साडेसहा हजार क्‍विंटलची आवक आहे. ७०० ते १००० रुपये प्रति क्‍विंटलने याचे व्यवहार सुरू आहेत.

इतर ताज्या घडामोडी
टॅंकर, चारा छावण्यांबाबत...पुणे : जिल्ह्याच्या काही तालुक्यांत पाणी आणि...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १०१...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १०१...
मुगाची हमीभावाने खरेदी सुरू करावीपरभणी ः मुगाची आधारभूत किंमत ७ हजार ५० रुपये...
विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर थेट...जायकवाडी, जि. औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील...
तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाचे फायदे समजून...औरंगाबाद : शेतीक्षेत्रात वापरावयाचे तंत्रज्ञान व...
नगरमध्ये सव्वीस महसूल मंडळांत पन्नास...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस नाही....
शेतकऱ्यांनी गटशेतीचा पर्याय अवलंबावा :...अमरावती :‘‘गटशेती ही काळाची गरज असून; शेतकऱ्यांनी...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे...नाशिक : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या...
खानदेशात पाऊस सरासरीच्या उंबरठ्यावरजळगाव : मागील आठवडाभरापासून खानदेशात अधूनमधून...
नांदेड जिल्ह्यातील खरिपात २ हजारांवर...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये २...
गडकिल्ले भाड्याने देण्याच्या...बुलडाणा : राज्यातील २५ गडकिल्ले लग्न समारंभासाठी...
'थेट शेतीमाल विक्रीमुळे गावाचे उत्पन्न...करमाड, जि. औरंगाबाद : थेट शेतीमाल खरेदीमुळे...
कडकनाथ कोंबडी वाटप योजनेची चौकशी करणार...पुणे : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या...
पुणे विभागातील २४ तालुक्यांत पाणी टंचाई...पुणे : पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा,...
कांदा उत्पादकांचे मालेगावात बिऱ्हाड...नाशिक : कांदा व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप...
पोल्ट्रीधारक करणार रविवारी जंतरमंतरवर...नागपूर ः पशुखाद्यात झालेली वाढ परिणामी वाढता...
जिल्हा परिषदेने तीन वर्षांत लावलेली ३८...नगर ः शासनाचे ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे...
नाबार्डकडून शेतकरी कंपन्यांना सर्वतोपरी...सोलापूर ः शेतीमालाचे उत्पादन आणि मार्केटिंगसह...
अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना ‘सियाम...औरंगाबाद : अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या...