Agriculture news in Marathi, Soybean rates are hike | Agrowon

सोयाबीनच्या दरात अल्पशी तेजी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जुलै 2019

नागपूर ः शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने तसेच नवा शेतीमालही नसल्याने बाजारातील आवक काहीशी मंदावली आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात सोयाबीनची आवक अवघी २०० क्‍विंटलची आहे. सोयाबीनचे दर ३४५० ते ३६११ रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात हे दर ३७०० ते ४११४ रुपयांवर पोचले. 

नागपूर ः शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने तसेच नवा शेतीमालही नसल्याने बाजारातील आवक काहीशी मंदावली आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात सोयाबीनची आवक अवघी २०० क्‍विंटलची आहे. सोयाबीनचे दर ३४५० ते ३६११ रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात हे दर ३७०० ते ४११४ रुपयांवर पोचले. 

कळमणा बाजार समितीत सध्या शेतीमालाची आवक जेमतेम आहे. सोयाबीनची गेल्या आठवड्यात १०२ क्‍विंटलची आवक होती. त्यात काहीशी वाढ होत आवक २०० क्‍विंटलपर्यंत पोचली. हंगामात ही आवक काही हजाराच्या घरात राहते. बाजारात हरभऱ्याची आवक १४३ ते ३१० क्‍विंटलची आहे. हरभऱ्याचे दर ३९०० ते ४१६२ रुपये क्‍विंटलचे आहेत. हरभरा दर गेल्या आठवड्यापासून स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तुरीची आवकदेखील ५० ते १०० क्‍विंटलचीच आहे. तुरीचे दर या आठवड्यात ४६०० ते ५७०० रुपये क्‍विंटलचे होते. 

मुगाचे दर ५००० ते ५२०० रुपये क्‍विंटलचे आहेत. मुगाची आवक अवघी २२ ते २३ क्‍विंटलची होती. बाजारात बटाटा आवक ४६५६ क्‍विंटलची असून, दर ९०० ते १२०० रुपये आहेत. गेल्या पंधरवाड्यापासून बटाटा दर स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. बटाट्याची आवक लगतच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातूनही होत असल्याचे सांगण्यात आले. 

पांढऱ्या कांद्याची आवक १७८६ क्‍विंटलची, तर दर १३०० ते १९०० रुपये आहेत. लसूण दरात सर्वाधिक तेजी अनुभवल्या जात आहे. २२१ क्‍विंटलची आवक लसणाची या आठवड्यात झाली. ४००० ते ८००० रुपये क्‍विंटलचा दर होता. आल्याचे दर ४००० ते ८००० रुपये क्‍विंटलचे,   तर आवक ३४२ क्‍विंटल होती. वाळलेल्या मिरचीच्या दरातही तेजी आली आहे. ७००० ते १०००० रुपये क्‍विंटलचे, दर तर आवक १३५३ क्‍विंटलची झाली.

इतर बाजारभाव बातम्या
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...
सोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...
राज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...
नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...
कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यात मूग सरासरी ५६०० रुपये क्विंटलअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात मिरची, गवार, भेंडीचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
औरंगाबादेत कांदा वधारलेला; गवारीच्या...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...