अकोल्यात सोयाबीनला ६१०० रुपये कमाल दर; सरासरी ५८०० रुपये

अकोलाबाजार समितीतशुक्रवारप्रमाणे शनिवारीही (ता.३) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन कमाल ६१०० विकले गेले. मात्र किमान दर ५३५० होता, तर सरासरी दर शुक्रवारच्या ५८०० वरुन शंभर रुपयांनी वाढत ५९०० एवढा झाला.
अकोल्यात सोयाबीनला ६१०० रुपये कमाल दर; सरासरी ५८०० रुपये
अकोल्यात सोयाबीनला ६१०० रुपये कमाल दर; सरासरी ५८०० रुपये

अकोला ः येथील बाजार समितीत सोयाबीन सरासरी दर आठवडाभरात ५३५० वरून थेट सरासरी ५८०० पर्यंत पोहोचला. सरासरी दरात सुमारे साडेचारशे रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारप्रमाणे शनिवारीही (ता.३) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन कमाल ६१०० विकले गेले. मात्र किमान दर ५३५० होता, तर सरासरी दर शुक्रवारच्या ५८०० वरुन शंभर रुपयांनी वाढत ५९०० एवढा झाला.  अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २४ मार्चला सोयाबीन कमीत कमी पाच हजार व जास्तीत जास्त ५६५० रुपये दराने विक्री झाली होती. या दिवशी ५३५० रुपयांचा सरासरी दर होता. २५ मार्चला सोयाबीनच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली. कमाल दर ५७०० मिळाला, तर सरासरी दर ५४०० पर्यंत प्रतिक्विंटल जाऊन पोचला. मार्च एंडमुळे काही दिवस बाजार समितीतील व्यवहार बंद होते. त्यानंतर पुन्हा १ एप्रिलपासून व्यवहार सुरू झाले. गुरुवारी बाजार समितीत सोयाबीनचा कमाल दर ५८०० झाला. तर सरासरी ५५०० रुपये दर मिळाला. २१०६ क्विंटल आवक झाली होती. शुक्रवारी तर सोयाबीनचा कमाल दर हा ३०० रुपयांनी वाढून तब्बल ६१०० रुपये मिळाला. कमीत कमी ५५००, तर सरासरी ५८०० रुपये दराने सोयाबीन विक्री झाले. ८१० क्विंटलची बाजारात आवक झाली होती. सहा हजारांवर सोयाबीन पोहोचल्याचे दिसून आले.  आगामी खरीप हंगाम दोन महिन्यांवर आला आहे. अशा स्थितीत शेतकरी बी-बियाणे, मशागत व इतर कामांसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहे. अशा स्थितीत चांगले सोयाबीन बियाण्याच्या दृष्टीने खरेदीकडे एक कल दिसून येत आहे. बाजारपेठेत सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने येत्या हंगामात लागवडीच्या दृष्टीने ही परिस्थिती पोषक वातावरण बनवित असल्याच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.  प्रतिक्रिया... यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी झालेले आहे. तर आता बाजारात सोयाबीनची आवक सुद्धा कमी होत आहे. दुसरीकडे तेलाचे दर वाढले. अशा स्थितीत सोयाबीनला मागणी आली आहे. त्यातून बाजारात सोयाबीन चांगल्या दराने विकत आहे. शुक्रवारी कमाल दर ६१०० रुपये भेटला. - सुनील मालोकार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com