agriculture news in marathi Soybean in Risod taluka Two and a half quintals productivity per hectare | Agrowon

रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच क्विंटल उत्पादकता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मातेरे झाले आहे.  नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेक्षणासाठी युवक कॉंग्रेसने पाठपुरावा केल्याने अखेर भर जहागीर महसूल मंडळात सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.

रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मातेरे झाले आहे.  नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेक्षणासाठी युवक कॉंग्रेसने पाठपुरावा केल्याने अखेर भर जहागीर महसूल मंडळात सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. भर जहागीर येथील एका प्लॉटचे उत्पन्न ८१.७६ किलोग्रॅम आले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम पैसेवारीकडे लागल्या आहेत.

अतिपावसाने घास हिरावला. शेतातील उभ्या सोयाबीन पिकाला कोंब आले. तरीही प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी इकडे लक्ष देत नव्हते.  परंतु, युवक कॉँग्रेसने मांगवाडी, भर जहागीर, कुऱ्हा, मोप, चाकोली या दोन महसुल मंडळांत तहसीलदार आशिष शेलार, कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, यांच्यासह इतरांनी  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

महसूल विभागाच्या आदेशानुसार भर जहागीर, मांगवाडी, गणेशपूर, एकलासपूर, पाचांबा, चिंचाबाभर, जवळा, नेर आदी गावातील १०० बाय १०० चे प्लॉट सोयाबीन पिकामध्ये टाकून त्याचे उत्पादन काढण्यात आले. 
भर जहागीर येथील प्रल्हाद फुके यांच्या शेतातील एका प्लॉटचे उत्पादन ८१.७६ किलो ग्रॅम आले. त्यामुळे हेक्टरी २ क्विंटल ४४ किलो उत्पादकता आली.  

यावेळी तलाठी रवींद्र खंडारे, पंचायत समिती सदस्य शारदा रवींद्र आढाव,  सरपंच पी. के. चोपडे, कृषी सहाय्यक एस. सी. खाडे, प्रल्हाद फुके, ग्रामपंचायत सदस्य महादेव क्षीरसागर, भानुदास गिते, देवराव कांबळे, गजानन सानप , प्रकाश सभादिंडे, महादेव घुगे, भगवान थोरात, महादेव थोरात, पवन सभादिंडे, यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...