परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या प्रमाणात यंदा वाढ

गतवर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या पावसात भिजल्यामुळे सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती कमी येत आहे. घरचे बियाणे वापरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी उगवणशक्ती तपासून घ्यावी. - प्रियंका भोसले, बिज परिक्षण अधिकारी,कृषी विभाग, बीज परिक्षण प्रयोगशाळा, परभणी.
Soybean seed failure in Parbhani This is an increase of 42.4 per cent
Soybean seed failure in Parbhani This is an increase of 42.4 per cent

परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक आहे. यंदा एप्रिल महिन्यात सोयाबीन बियाण्यांच्या ७९६ नमुन्यांची उगवशक्ती चाचणी घेतली. त्यापैकी ४३० नमुने (५४.०२ टक्के) नापास ठरले आहेत. प्रमाणित बियाण्यामध्ये नापासाचे प्रमाण ५१.३८ टक्के आहे. इतर बियाणे नमुन्यामध्ये नापासाचे प्रमाण ८०.५५ टक्के एवढे आहे. कृषी विभागाच्या बिज परिक्षण प्रयोगशाळेतील उगणशक्ती तपासणी चाचणीच्या निष्कर्षावरुन स्पष्ट झाले आहे. गतवर्षी सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण ९.३४ टक्के होते. 

यंदाच्या एप्रिल महिन्यात येथील बिज परिक्षण प्रयोगशाळेकडे विविध पिकांचे १ हजार ५७३ नमुने उगवशक्ती चाचणी तपासणीसाठी प्राप्त झाले होते. एकूण तपासणी केलेल्या ९१८ पैकी ४४६ बियाणे नमुने नापास ठरले आहेत.

पीकनिहाय विचार केला असता सोयाबीनच्या प्रमाणित बियाण्याचे १ हजार ३२८ आणि शेतकरी, अन्य बिजोत्पादकांचे ८३ बियाणे नमुने असे एकूण १ हजार ४११ बियाणे नमुने प्राप्त झाले होते. त्यापैकी ७९६ नमुन्याची उगवशक्ती चाचणी घेतली. त्यावेळी ४३० नमुन्याची उगवणशक्ती कमी आल्याचे आढळून आले. त्यामुळे ते नापास ठरले. त्यात प्रमाणित बियाण्याचे ७२४ पैकी ३७२ नमुने आणि इतर मध्ये ७२ पैकी ५८ नमुने नापास ठरले आहेत. 

ज्वारी बियाण्याचे १७ पैकी २, तर मुगाचे ५९ पैकी १३ नमुने नापास ठरले. उडदाच्या २९ पैकी एकही नमुना नापास नाही. तुरीच्या ८ पैकी १ नमुना नापास ठरला. गतवर्षीच्या एप्रिल महिन्यात एकूण ३ हजार ३३० बियाणे नमुने प्राप्त झाले होते. त्यांपैकी १ हजार ७९९ नमुन्यांची उगवणशक्ती चाचणी घेतली. त्यावेळी १८३ नमुने नापास ठरले होते. सोयाबीनच्या १ हजार ६३८ पैकी १५३ नमुने (९.३४ टक्के) नापास ठरले होते. त्यात प्रमाणित बियाण्याचे १ हजार ४६९ पैकी १२८ नमुने आणि इतर १३९ पैकी २५ नमुने नापास ठरले होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com