agriculture news in Marathi soybean seed selling on high rate Maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची चढ्या दराने विक्री 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 जून 2021

अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. मात्र, सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने अनेक खासगी कंपन्यांचे बियाणे विक्रेते चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. मात्र, सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने अनेक खासगी कंपन्यांचे बियाणे विक्रेते चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कृषी विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. 

मृग नक्षत्राच्या अगोदरच पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. इतर गळीत धान्य पिके कमी होत असताना सोयाबीनचे क्षेत्र वाढते आहे. मात्र, एकीकडे बियाणे तुटवडा, गुणवत्तेचा प्रश्न असताना बियाणे दरवाढ शेतकऱ्यांसाठी अडचणीची आहे. त्यात चढ्या दराने विक्री करून कोंडी केली जात आहे. 

विक्रेते छापील किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे विक्री करत आहेत. मात्र, या व्यवहारात बिले छापील किमतीची दिले जात आहेत. तर त्यापेक्षाही अधिक दर घेतले जात असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काही शेतकरी पुढे येऊन बोलत नसल्याचा विक्रेते फायदा घेत असल्याचा शेतकऱ्यांमध्ये सूर आहे. 

नाव न सांगण्याच्या अटीवर एका शेतकऱ्याने सांगितले की, निफाड येथे एका खासगी कंपनीचे बियाणे ३४५० रुपये ३० किलो बॅगप्रमाणे असताना विक्रेते ३८०० ते ४००० प्रमाणे विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पुन्हा दरवाढीच्या या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. 

कृषिमंत्र्यांकडे फोनवरून तक्रार 
बियाणे तुटवड्याचा फायदा घेत विक्रेते चढ्या दराने बियाणे विकत आहेत. त्यामुळे या प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना संपर्क करत तक्रार केली. मात्र, सविस्तर माहिती द्यावी कारवाई करू, असे त्यांनी सांगितले. मात्र, आता तरी कृषी विभाग जागा होणार का? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. 

प्रतिक्रिया 
बिले छापील किमतीची दिली जात आहेत. मात्र, १० ते १५ टक्के जास्त रक्कम घेतली जात आहे. साठा व बियाणे उपलब्धता कमी असल्याची कारणे देऊन लूट केली जात आहे. खासगी कंपनीच्या बियाण्यांत लूट जास्त आहे. 
- ज्ञानेश्वर कांगुणे, सोयाबीन उत्पादक, दरसवाडी, ता. चांदवड 

चौकशी केली तर बियाणे वेळेवर भेटले नाही. काही ठिकाणी उपलब्ध असताना अनेकजण साठा नसल्याचे कारण देत टाळत होते. मात्र, काही शेतकऱ्यांना चढ्या दराने देऊन विक्री केली आहे. 
- प्रवीण खुटे, सोयाबीन उत्पादक, पिंपळगाव नजीक, ता. निफाड 
 


इतर अॅग्रो विशेष
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...