Agriculture news in marathi Of soybean seeds Match for kharif | Page 3 ||| Agrowon

सोयाबीन बियाण्यांची खरिपासाठी जुळवाजुळव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन बियाण्याची शोधाशोध करू लागले आहेत. सध्या ज्यांच्याकडे सोयाबीन उपलब्ध आहे, असे शेतकरी, शेतकरी गटांकडून ८० ते १०० रुपयांदरम्यान प्रति किलो दराने विक्री केली जात आहे.

अकोला : येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन बियाण्याची शोधाशोध करू लागले आहेत. सध्या ज्यांच्याकडे सोयाबीन उपलब्ध आहे, असे शेतकरी, शेतकरी गटांकडून ८० ते १०० रुपयांदरम्यान प्रति किलो दराने विक्री केली जात आहे.

या हंगामात सोयाबीन बियाण्याच्या उपलब्धतेबाबत आतापासूनच विविध प्रश्‍न उपस्थित केले जाऊ लागलेले आहेत. प्रामुख्याने गेल्यावेळी काढणीच्या काळात पाऊस झाल्याने सोयाबीनचा दर्जा काही भागात मोठ्या प्रमाणात खालावला होता. अशा स्थितीत बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला यंदा दरही हमीभावापेक्षा अधिक मिळालेला आहे. आता हंगामात लागवड करायची तर सोयाबीन बियाणे कसे मिळवायचे हा पेच आहे. काही शेतकऱ्यांजवळ सोयाबीन आहे. त्यांनी विक्री सुरू केली असून, साधारणपणे ८ ते १० हजार रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल दर आकारत आहेत. 

बाजारपेठांमध्ये सोयाबीन गेल्या काही दिवसांत सात हजारांपर्यंत विक्री झाली होती. ही तेजी अद्यापही कायम आहे. या भागातील बाजार समित्यांमध्ये मध्य प्रदेशातील विविध बियाणे कंपन्यांनी सोयाबीनची खरेदी केलेली आहे. संपूर्ण चांगले सोयाबीन कंपन्यांनी गोळा केले असून, तेच आता प्रक्रिया करून शेतकऱ्यांना या हंगामासाठी विक्री केले जाणार आहे. गेल्या वर्षात सोयाबीन उगवणीबाबत हजारोंच्या संख्येने तक्रारी झाल्या होत्या. हे सर्व लक्षात घेता शेतकरी सजगपणे बियाण्याचा शोध घेत आहे. ठिकठिकाणी बियाण्याची विचारणा सुरू झालेली आहे.

प्रतिक्रिया

सोयाबीन बियाण्याला या वर्षी केंद्र, राज्य सरकारकडून अनुदान द्यायला हवे. जसे हरभरा बियाण्यासाठी भेटले होते. शासनाने अनुदान दिले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची गावागावात मागणी पुढे येत आहे. 
- श्रीकृष्ण शेलकर, शेतकरी, मोताळा, जि. बुलडाणा

प्रतिक्रिया
यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासणार आहे, हे आतापासून दिसत आहे. काही जणांनी सोयाबीन साठवलेले आहे. परंतु त्याच्या उगवणीबाबतचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. माझ्याकडे चार लॉट होते. पैकी एक पास झाला. 
-विनोद पाटील, शेतकरी, सुडी, जि. वाशीम 

प्रतिक्रिया

बहुतेक शेतकऱ्यांकडील सोयाबीन विकून झालेले आहे. ज्यांच्याकडे आहे ते प्रति किलो १०० रुपयांनीही द्यायला मागेपुढे करीत आहेत. यंदा सोयाबीन बियाण्याचा दर अस्मानाला भिडला आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे स्वतः जवळचे सोयाबीन विक्री केले. यंदा त्यामुळे सोयाबीन बियाण्याची टंचाई निश्चित जाणवणार आहे. शिवाय खरेदी केलेल्या बियाण्याची उगवण क्षमता सुद्धा महत्त्वाची राहील. ती तपासूनच शेतकऱ्यांना मिळायला हवी. सरकारने आत्तापासूनच नियोजन करून पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना गावागावांत शुद्ध बियाणे पुरविण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली केल्या पाहिजेत. पेरणीनंतर बियाणे मिळाले तर ते वराती मागून घोडे दामटण्याचा प्रकार होईल. 
-डी. एन. पांचाळ, 
शेतकरी, गोरेगाव, जि. बुलडाणा


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...