सांगलीमधील प्रत्येक तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे

जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगावसह अन्य तालुक्यांत देखील सोयाबीन पीक घेतले जाते. नाफेडने सांगली बाजार समितीत हमीभाव केंद्र सुरू केले आहे. वाळवा तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करायची असेल तर सांगलीला यावे लागणार आहे.
Soybean shopping center should be started in every taluka of Sangli
Soybean shopping center should be started in every taluka of Sangli

सांगली ः जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगावसह अन्य तालुक्यांत देखील सोयाबीन पीक घेतले जाते. नाफेडने सांगली बाजार समितीत हमीभाव केंद्र सुरू केले आहे. वाळवा तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करायची असेल तर सांगलीला यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहे.

जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा ४१ हजार ६७५ हेक्टरवर झाला आहे. सर्वाधिक पेरणी वाळवा तालुक्यात आहे. शासन शेतीमालास हमीभाव जाहीर केल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत असल्याचे शेतकरी सांगतात. शासनाने यंदा सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये प्रतिक्विंटल खरेदीचा दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सांगली येथील बाजार समितीत हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याची नोंदणी देखील सुरू झाली आहे. वाळवा, खानापूर, तासगाव, शिराळा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी केली जाते. त्यातच ऊस पिकात आंतरपिक म्हणून सोयाबीनचे उत्पादन घेण्याचा कल वाढला आहे.

वास्तविक पाहता, जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र एकच आहे. मुळात पाचत चे सहा तालुक्यात देखील सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक तालुक्याचा विचार करता, याठिकाणी हमीभाव केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. दरवर्षी सांगली येथेच हमीभाव केंद्र सुरू केले जाते. सांगली येथील केंद्रात नोंदणीसाठी जावे लागते. त्यानंतर विक्रीसाठी असे हेलपाटे मारावे लागणार आहेत. त्यातच वेळ आणि गाडी भाडे शेतकऱ्यांच्या माथी पडले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

सोयाबीन नोंदणीला प्रतिसादच नाही सांगली बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहे. सोयाबीन हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. सोयाबीन विकायचे आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती घेऊन शेतकरी जात आहे. आठ दिवसांत एकाही शेतकऱ्यांने नोंद केली नसल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com