नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात सोयाबीनची नऊशे हेक्‍टरवर पेरणी

नांदेड : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले सोयाबीन बियाणे पेरणीसाठी तयार करावे, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले होते. यास प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात ९०० हेक्टरवर सोयाबीन बिजोत्पादन घेतले आहे.
Soybean sowing on 900 hectares in summer season in Nanded district
Soybean sowing on 900 hectares in summer season in Nanded district

नांदेड : ‘‘आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले सोयाबीन बियाणे पेरणीसाठी तयार करावे, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले होते. यास प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात ९०० हेक्टरवर सोयाबीन बिजोत्पादन घेतले आहे. उन्हाळी हंगामात एकूण २३ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली’’, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मागील वर्षी पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यात रब्बी तसेच उन्हाळी हंगामात पेरा वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली होती. त्यानुसार नियोजनही केले होते. गेल्या वर्षी वार्षिक सरासरीच्या १०७ टक्के पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पासह जिल्हा शेजारील प्रकल्प तुडुंब भरले होते. परिणामी, रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढले.

यानंतरही उन्हाळ्यात पेरणीचे क्षेत्र सरासरी सहा हजार २४० हेक्टर आहे. यंदा २३ हजार ५० हेक्‍टरवर आजपर्यंत पेरणी झाली आहे. दरम्यान, यंदा शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पेरा केला आहे. आगामी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या सोयाबीन बियाणे शेतात तयार करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. यानुसार यंदा प्रथमच सोयाबीन ८९८ हेक्‍टरवर पेरणी झाली. 

पीकनिहाय पेरणी 

यंदा जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार ७९१ हेक्टरवर पेरणी भुईमुगाची झाली. या खालोखाल चार हजार ८९५ हेक्टरवर उन्हाळी ज्वारी, ८९८ हेक्टरवर सोयाबीन, ५१६ हेक्टरवर उन्हाळी तांदूळ, एक हजार ८२८ हेक्टरवर तीळ, १४ हेक्टरवर उन्हाळी सूर्यफूल, एक हजार ८६४ हेक्टरवर उन्हाळी मक्याची पेरणी केली आहे.

कंधारमध्ये सर्वाधिक पेरणी

उन्हाळी हंगामात सर्वाधिक पाच हजार ६८८ हेक्टरवर पेरणी कंधार तालुक्यात झाली. त्याखालोखाल किनवट तालुक्‍यात पाच हजार ८२ हेक्टर, माहूर तालुक्यात दोन हजार १२० हेक्टर, मुखेड तालुक्यात दोन हजार ९८० हेक्टर, बिलोली एक हजार १३० हेक्टर, मुदखेड एक हजार ६७९ हेक्टर, हदगाव ७८३ हेक्टर, भोकर ६४६ हेक्टर, हिमायतनगर ३६० हेक्टर, धर्माबाद २९५ हेक्टर, नायगाव ८६८ हेक्टर, देगलूर ७२८ हेक्टर, नांदेड ६९१ हेक्टरवर पेरणी झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com