agriculture news in marathi Soybean sowing and threshing in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यात सोयाबीनच्या सोंगणी, मळणीत बाधा

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

अकोला ः परतीच्या पावसाने सोयाबीन हंगामाची दाणादाण उडविली आहे. अधून-मधून येत असलेल्या पावसामुळे आता सोयाबीन सोंगणी व मळणीच्या कामात अडथळे तयार होत आहेत.

अकोला ः परतीच्या पावसाने सोयाबीन हंगामाची दाणादाण उडविली आहे. अधून-मधून येत असलेल्या पावसामुळे आता सोयाबीन सोंगणी व मळणीच्या कामात अडथळे तयार होत आहेत. मागील २४ तासांत जिल्ह्यात बाळापूर, तेल्हारा तालुक्यात दमदार पावसाची नोंद झाली. अद्यापही पावसाचे वातावरण आहे. 

शुक्रवारी (ता.१६) बाळापूर तालुक्यात १६.३, तर तेल्हारामध्ये १२.३ मिलिमीटर पाऊस झाला. या आठवड्यात बऱ्याचवेळा पावसाने हजेरी लावली. सध्या सोयाबीन सोंगणी, मळणीचे कामे जोमाने सुरु आहेत. यंदाच्या मोसमात आधी मूग, उडदाचे पीक फारसे आले नाही. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा सोयाबीन या प्रमुख पिकावर होत्या.

सोयाबीन काढणी सुरु होत असतानाच पावसाने ठाण मांडले. काही ठिकाणी सोयाबीनची सोंगणी, मळणीचे काम जोरावर आले होते. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने पीक ओले झाले. त्यामुळे सोंगणीचे, मळणीचे काम ठप्प झाले.

सोयाबीनची झडती यंदा दरवर्षीच्या तुलनेने कमी आहे. पीक चांगले दिसूनही त्याला लागलेल्या शेंगांमध्ये पुरेशा प्रमाणात दाणे भरले नव्हते.  परिणामी, सोयाबीनचे उत्पादन एकरी सरासरी तीन ते सहा क्विंटल आहे. एवढ्या उत्पादनात शेतकऱ्यांचा खर्चही निघण्याची चिन्हे नाहीत.

खोडकीडीमुळे तेल्हारा तालुक्यात अनेकांनी सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरही फिरवलेला आहे. काही दिवसांपूर्वीच गाडेगाव येथे शेतकरी समाधान साबळे आणि गजानन साबळे यांनी आपल्या सात एकर सोयाबीनच्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर चालवून पीक उपटून फेकले. काहींनी त्या पिकात जनावरे सोडली होती.


इतर ताज्या घडामोडी
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...
चिखलीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘रयत’...बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते...
नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळासाठी...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
सरकारने नाकर्तेपणा दाखवू नये : दरकेर सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...