agriculture news in Marathi, soybean sowing increased by 9 percent, Maharashtra | Agrowon

सोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढ
वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात १११ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत क्षेत्र नऊ टक्के वाढल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत मात्र यंदा लागवड क्षेत्रात किंचित घट झाली आहे.

नवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात १११ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत क्षेत्र नऊ टक्के वाढल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत मात्र यंदा लागवड क्षेत्रात किंचित घट झाली आहे.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि तेलंगणा या प्रमुख राज्यांत पावसाने साथ दिल्यामुळे सोयाबीनची लागवड वाढल्याने देशातील एकूण सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. हजर बाजारात सोयाबीनला चांगला भाव असल्यामुळे मध्य प्रदेशात गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन लागवडीत ११ टक्के वाढ झाली. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सोयाबीन वाढीच्या अवसथेत असून, किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी वारंवार पिकाची पाहणी करून आवश्यकता भासल्यास कीडनाशकांची योग्य त्या प्रमाणात फवारणी करावी, असा शास्त्रज्ञांचा सल्ला आहे. किडींचा सुरवातीच्या टप्प्यातच बंदोबस्त केला, तर पिकाचे मोठे नुकसान टळू शकते, असे शास्त्रज्ञ म्हणाले.

वास्तविक सोयाबीनची पेरणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करणे अपेक्षित असते. काही शेतकरी मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरण्या लांबवतात. पण त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर विपरित परिणाम होतो, याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष वेधले. प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये झालेला समाधानकारक पाऊस आणि तुलनेने किफायतशीर बाजारभाव यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक ओढा राहिला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

देशातील एकूण तेलबिया उत्पादनात सोयाबीनचा वाटा तब्बल ४० टक्के इतका मोठा आहे. देशातील निम्म्याहून अधिक सोयाबीन मध्य प्रदेशमध्ये पिकवला जातो.
 

इतर अॅग्रो विशेष
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
फूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...
पुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...