Agriculture news in Marathi Soybean sowing increased in Khandesh | Page 2 ||| Agrowon

सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढली

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

जळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे क्षेत्र यंदा सुमारे चार हजार हेक्टरने वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचा अंदाज आहे. पिकाची स्थिती चोपडा, पाचोरा भागात चांगली आहे. इतर भागात मात्र कमी पावसामुळे फटका बसला आहे.

जळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे क्षेत्र यंदा सुमारे चार हजार हेक्टरने वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचा अंदाज आहे. पिकाची स्थिती चोपडा, पाचोरा भागात चांगली आहे. इतर भागात मात्र कमी पावसामुळे फटका बसला आहे.

यंदा कोरोनाच्या संकटात मका, बाजरी, कापूस उत्पादकांना फटका बसला. कापसाला कमी दर मिळाले. त्याची विक्री शासकीय यंत्रणांमध्ये रांगा लावून करावी लागली. बाजरी, मक्याचे दर मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाले. त्याचीही विक्री बाजारात करताना नाकीनऊ आले. यामुळे शेतकरी संकटात सापडले. आर्थिक कोंडी झाली. संबंधित पिकांच्या विक्रीबाबत अडचणी आल्याने व बाजारात मागणी कमी असल्याने खरिपात शेतकरी तृणधान्य, कडधान्याएवजी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत.

सोयाबीनचे दर मागील हंगामात २४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. कारण सोयाबीनची आयात कमी होऊ शकते. कोरोनामुळे जगभरात माल वाहतूक, परकी देशातील विक्रीसंबंधी अडचणी येत आहेत. यामुळे अनेक शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. तसेच रावेर, यावल, चोपडा, भुसावळ, जामनेर या भागात काही शेतकऱ्यांनी तीळ, भुईमूग पेरणीदेखील केली आहे.

सोयाबीनची पेरणी खानदेशात जळगाव जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टरवर झाली आहे. नेमकी आकडेवारी पुढील आठवड्यात प्राप्त होऊ शकते. परंतु सद्यःस्थितीमध्ये सोयाबीनची पेरणी सर्वत्र आटोपली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, भुसावळ, यावल, जामनेर व पाचोरा भागात सोयाबीनचे पीक अधिक आहे. तर धुळ्यातील शिरपूर व शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा व तळोदा भागात सोयाबीनची पेरणी अधिक झाली आहे. खानदेशात मिळून सुमारे ४० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. मागील हंगामात खानदेशात सुमारे ३६ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती.

सोयाबीनचे हमीभाव वाढण्याची अपेक्षा
जळगाव जिल्ह्यात यंदा २८ ते २९ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी अपेक्षित होती. सोयाबीन खरेदीसाठी शासनही यंदा पुढाकार घेणार आहे. कारण शासनाने तेलबिया उत्पादन व खाद्यतेलासंबंधी स्वयंपूर्णतेचा नारा दिला आहे. हमीभावात अधिकाधिक खरेदी होईल, अशी अपेक्षादेखील सोयाबीन उत्पादकांना आहे, असे चित्र खानदेशात दिसत आहे.


इतर ताज्या घडामोडी
अधिक आर्द्रतायुक्त वातावरणात द्राक्ष...सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत पाऊस व पावसाळी...
जमीन सुपिकतेसाठी कंपोस्ट खत निर्मितीकंपोस्ट खताचा उपयोग जमिनीत केल्यास जमिनीत पूर्वी...
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...