agriculture news in Marathi soybean sowing may increased by 10 percent Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के वाढीची शक्यता 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

बियाणे उपलब्धता नसल्याने शेतकरी लागवड कमी करतील तर सोयाबीन उद्योगाशी संबंधित जाणकारांनी मात्र या वर्षी देशात ९.९% लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज वर्तविला आहे.

नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि उत्पादनासंदर्भात विविध दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काहींच्या मते यावर्षी बियाणे उपलब्धता नसल्याने शेतकरी लागवड कमी करतील तर सोयाबीन उद्योगाशी संबंधित जाणकारांनी मात्र या वर्षी देशात ९.९% लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज वर्तविला आहे. 

सोयाबीन प्रक्रिया उद्योगाशी संबंधित जाणकारांच्या मतानुसार, यावर्षी जागतिक स्तरावर सोयाबीन उत्पादक देशांमध्ये विविध कारणांमुळे उत्पादन घटले. परिणामी खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली. आंतरराष्ट्रीयस्तरावरील दरातील तेजी भारतातही अनुभवण्यात आली. भारतात ३८८० रुपये सोयाबीनचा हमीभाव होता.

हंगामा अखेरीस सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट दर मिळाला. ६००० ते ७००० रुपयांपर्यंत बाजार होता. आंतरराष्ट्रीयस्तरावर देखील सोयाबीन दरात तेजी आहे. त्यासोबतच चालू व्यापारी वर्षात जगातील प्रक्रिया उद्योजकांकडे असलेला कच्‍या मालाचा साठा देखील कमी होणार आहे. त्यामुळेच दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

दुसरीकडे सोयाबीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मात्र यावर्षी लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तवली आहे. देशात बियाण्यांचा तुटवडा असला आणि लागवड वाढणार असेल तर मग बियाण्यांसाठी ओरड होणे अपेक्षित होते. मात्र सोयाबीन उत्पादक राज्यांतून अशा प्रकारची बियाण्यांबातची ओरड झाली नाही. त्यामुळेच शेतकरी लागवड क्षेत्र कमी करतील, असे संकेत आहेत.

‘महाबीज’देखील मध्य प्रदेशातून बियाणे घेते. त्यांच्याकडून देखील अतिरिक्त बियाणे मागणी झाली नाही. परिणामी याला दुजोरा मिळतो, असे मध्य प्रदेशातील एका व्यापाऱ्याने सांगितले. दुसरीकडे राजस्थानमध्ये सोयाबीन खालील क्षेत्रात एक लाख हेक्‍टर वाढीचा निर्णय घेतला आहे. 

दर तेजीतच 
वायदे बाजारात १८ एप्रिल २०२१ रोजी सोयाबीनचे दर ८१०० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले होते. आता हे दर ७१४० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. गेल्या वर्षीच्या दरासोबत याची तुलना केल्यास दरातील वाढ ८० टक्के आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात देखील सोयाबीनचे दर खाली येण्याची शक्यता कमीच आहे. कारण जून ते ऑगस्ट या दरम्यान सोयाबीनची लागवड होते. त्याकरिता बियाणे उपलब्ध होण्याचे आव्हान देखील शेतक‍ऱ्यांसमोर आहे. शेतकरी आपल्याकडील बियाण्यांचा वापर करतात मात्र गेल्या हंगामात पावसामुळे सोयाबीनची पत खालावली. परिणामी अशा बियाण्यांची उगवणक्षमता कमी राहणार आहे. 

बियाण्याची टंचाई 
२०२१-२२ या वर्षात २,८९,८६६ टन बियाण्याची गरज आहे. त्यापैकी २,८१,१०१ टन बियाणेच देशात उपलब्ध आहे. अशी स्थिती असली तरी देशात हमीभावापेक्षा सोयाबीनला दुप्पट दर मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन लागवड क्षेत्र वाढ होणार आहे. २०२०-२१ मध्ये १२१ लाख हेक्टर असलेले हे क्षेत्र ९.९ टक्क्यांनी वाढून १३३ लाख हेक्‍टरवर पोहोचेल, असे जाणकार सांगतात. 
 


इतर अॅग्रोमनी
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे...पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास...जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे...
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा...जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘...
साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत...
कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...
जागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...