मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक पेरणी

खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के आटोपल्या आहेत. मराठवाड्यात यंदा सरासरी ५० लाख १२ हजार ६४१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४० लाख ९६ हजार ८७६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
soybean
soybean

औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के आटोपल्या आहेत. मराठवाड्यात यंदा सरासरी ५० लाख १२ हजार ६४१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४० लाख ९६ हजार ८७६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सरासरी २० लाख ९३ हजार ४९३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १८ लाख ८३ हजार २८५ हेक्टरवर अर्थात ९० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातील सरासरी २९ लाख १९ हजार १४८ हेक्टर खरीप क्षेत्राच्या तुलनेत ७६ टक्के अर्थात २२ लाख १३ हजार ५९१ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.  १७ लाख हेक्‍टरवर सोयाबीन यंदा मराठवाड्यात खरिपातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १६ लाख ६३ हजार १५ हेक्‍टर इतके आहे. प्रत्यक्षात त्याच्यापुढे जाऊन १०७ टक्के क्षेत्रावर अर्थात १७ लाख १६ हजार ४१४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे.  सरासरी क्षेत्रावर कपाशी नाहीच मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होणाऱ्या मराठवाड्यात यंदा ८ जुलै अखेरपर्यंत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ८१ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. मराठवाड्यात यंदा कपाशीचे सरासरी क्षेत्र १५ लाख ९४ हजार ३०० हेक्‍टर इतके आहे. त्या तुलनेत मराठवाड्यात १३ लाख ४३ हजार ४९९ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाल्याची माहिती कृषी व महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय पेरणीचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

लातूर ५ लाख ४४ हजार ९३८ 
उस्मानाबाद  ३ लाख ७५ हजार १७८ 
नांदेड ६ लाख ३४ हजार ८६९ 
परभणी   ३ लाख ९० हजार ५४६ 
हिंगोली  २ लाख ६८ हजार ६०
औरंगाबाद ६ लाख १४ हजार ५२८
जालना  ५ लाख ४८ हजार ६९२ 
बीड  ७ लाख २० हजार ६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com