agriculture news in Marathi soybean sowing over average area Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक पेरणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के आटोपल्या आहेत. मराठवाड्यात यंदा सरासरी ५० लाख १२ हजार ६४१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४० लाख ९६ हजार ८७६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
 

औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के आटोपल्या आहेत. मराठवाड्यात यंदा सरासरी ५० लाख १२ हजार ६४१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४० लाख ९६ हजार ८७६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सरासरी २० लाख ९३ हजार ४९३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १८ लाख ८३ हजार २८५ हेक्टरवर अर्थात ९० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातील सरासरी २९ लाख १९ हजार १४८ हेक्टर खरीप क्षेत्राच्या तुलनेत ७६ टक्के अर्थात २२ लाख १३ हजार ५९१ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. 

१७ लाख हेक्‍टरवर सोयाबीन
यंदा मराठवाड्यात खरिपातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १६ लाख ६३ हजार १५ हेक्‍टर इतके आहे. प्रत्यक्षात त्याच्यापुढे जाऊन १०७ टक्के क्षेत्रावर अर्थात १७ लाख १६ हजार ४१४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. 

सरासरी क्षेत्रावर कपाशी नाहीच
मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होणाऱ्या मराठवाड्यात यंदा ८ जुलै अखेरपर्यंत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ८१ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. मराठवाड्यात यंदा कपाशीचे सरासरी क्षेत्र १५ लाख ९४ हजार ३०० हेक्‍टर इतके आहे. त्या तुलनेत मराठवाड्यात १३ लाख ४३ हजार ४९९ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाल्याची माहिती कृषी व महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय पेरणीचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

लातूर ५ लाख ४४ हजार ९३८ 
उस्मानाबाद  ३ लाख ७५ हजार १७८ 
नांदेड ६ लाख ३४ हजार ८६९ 
परभणी   ३ लाख ९० हजार ५४६ 
हिंगोली  २ लाख ६८ हजार ६०
औरंगाबाद ६ लाख १४ हजार ५२८
जालना  ५ लाख ४८ हजार ६९२ 
बीड  ७ लाख २० हजार ६५

इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....