मराठवाड्यात सोयाबीनचा साडेबारा लाख हेक्टरवर पेरा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : मराठवाड्यात यंदा खरिपासाठी सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ३८ हजार ८९० हेक्‍टर प्रस्तावित करण्यात आले होते. या तुलनेत सोमवारपर्यंत (ता. ९) तब्बल १२ लाख ५७ हजार ६४० हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मराठवाड्यात प्रथमच सोयाबीनने कपाशीला पेरणी क्षेत्रात मागे टाकल्याचे चित्र सध्या दिसून येत असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मराठवाड्यात यंदा खरिपात उस वगळून ४६ लाख ७२ हजार ५५४ हेक्‍टरवर विविध पिकांची पेरणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्या तुलनेत ३० लाख ९७ हजार ७२२ हेक्‍टरवर म्हणजेच ६६.३० टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. अजूनही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास ४४ टक्‍के क्षेत्र पेरणीविना असल्याचे आकडेवारीवरून दिसते. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा मराठवाड्यात कपाशीचे क्षेत्र घटणार हे जवळपास निश्‍चित होते. कपाशीला पर्याय म्हणून शेतकरी सोयाबीनकडे वळणार हेदेखील स्पष्टच होते.

मराठवाड्यात सोयाबीनच्या सर्वसाधारण १० लाख ३८ हजार हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत १२ लाख ५७ हजार हेक्‍टरवर अर्थात १२१ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कपाशीचे यंदा १७ लाख १७ हजार ४५१ हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. त्या तुलनेत कपाशीची ६१.५२ टक्‍के क्षेत्रावर म्हणजे १० लाख ५६ हजार ५२७ हेक्‍टरवर लागवड झाली आहे. सुमारे दोन लाख हेक्‍टरने सोयाबीनचे क्षेत्र कपाशीपेक्षा अधिक आहे.

इतर खरीप पिकांमध्ये भाताची २३५३, ज्वारीची ७४ हजार २३६, बाजरीची ४२ हजार ६२७, मकाची १ लाख ६८ हजार २९६, इतर तृणधान्यांची २०५८, तुरीची २ लाख ८६ हजार २१६, मुगाची १ लाख १० हजार ७५६, उडदाची ८२ हजार ७३२, खरीप भुईमुगाची ६२१०, तिळाची ३३०४, कारळ्याची १२५५ आणि खरीप सूर्यफूलाची ९६३ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.  

जिल्हानिहाय सोयाबीनचे क्षेत्र (हेक्‍टर)
जिल्हा  सर्वसाधारण क्षेत्र  प्रत्यक्ष पेरणी
औरंगाबाद  १०,७२३   १२,४२७
जालना ७१,१६७   ६९,७२८
बीड  ८६,०२२ १,१५,४६३
परभणी  १,३३,३२०  १,६४,७९५
हिंंगोली  १,५७,५२८  २,०५,६७५
लातूर   २,७४,०७९   २,९८,३५६
उस्मानाबाद १,०६,९६२ १,३७,८०१
नांदेड १,९९,०८९  २,५३,३९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com