सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल 

कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे घटक सोयाबीन दरातील तेजी कायम राहून दराचा विक्रमी टप्पा गाठण्यासाठी इंधनाचे काम करत आहेत.
soybean
soybean

कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे घटक सोयाबीन दरातील तेजी कायम राहून दराचा विक्रमी टप्पा गाठण्यासाठी इंधनाचे काम करत आहेत. सध्या शेतकरी, व्यापारी आणि साठेबाज यांच्याकडे कमी माल उपलब्ध आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दर वाढून सोयाबीन यंदा ५१५० ते ५४०० रुपयांच्या टप्पा गाठेल.  देशात यंदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने सोयाबीन उत्पादनात घट आली. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभीपासूनच दरात सुधारणा होत आहे. त्यातच जागतिक सोयाबीन उत्पादनही घटले आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) नुकतेच जाहीर केलेल्या अहवालात जागतिक सोयाबीन उत्पादनात घट झाल्याचे म्हटले आहे. तसेच जागतिक सोयाबीन साठाही घटला आहे, असे नमूद केले. त्यामुळे देशात बर्ड फ्लूमुळे सोयाबीन अल्प काळात दबावात राहून पुन्हा सुधारले. ‘यूएसडीए’च्या अहवालानंतर सोयाबीन दरात पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘सीबॉट’वर काही काळात सोयाबीन १२९० डॉलर प्रतिबुशेलवरून १४५० डॉलर प्रतिबुशेलवर गेले आहे. 

भारतीय सोयामिलमध्ये प्रथिने जास्त आहेत. त्यामुळे भारतीय सोयामिलला व्हिएतनाम आणि अमेरिकेतून मागणी आहे. त्यामुळे विविध अहवालांमधून यंदा देशातून मागील वर्षीच्या तुलनेत सोयामिल निर्यात दुप्पट होण्याचा अंदाज आहे. सोयामिल यंदा १५ वर्षांतील विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता आहे. सध्या सोयामिलचे दर हे ३६ हजार ते ३७ हजार रुपये प्रतिटन आहेत. येणाऱ्या काळात हे दर ४० हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. 

सोयाबीनचा साठा कमी  सोयाबीन विक्रीचा हंगाम संपल्यात जमा आहे. सध्या शेतकरी, व्यापारी आणि साठेबाज यांच्याकडे कमी माल उपलब्ध असून, त्यांना यंदा चांगले दर मिळाले. जे काही सोयाबीन शिल्लक आहे त्यावर पुढील ६ ते ७ महिने, पुढील हंगामातील सोयाबीन बाजारात येईपर्यंत गरज भागवायची आहे. त्यामुळे दरात मोठी सुधारणा होण्याचा अंदाज आहे.  मका दरात सुधारणा  मका दर २०२० मध्ये दबावात होते. मात्र अलीकडच्या काळात मका दरात सुधारणा झाली होती. त्यानंतर देशात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव काही राज्यांमध्ये आढळला. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांची संख्या वाढत गेली तशी पोल्ट्री उद्योगाला फटका बसला. पोल्ट्रीचे मुख्य खाद्य असलेल्या मक्याच्या दरातही घसरण झाली. परंतु आता दर सुधारले आहेत. स्थानिक बाजारात अनेक ठिकणी दर हे १००० ते १४५० रुपये प्रतिक्विंटलच्या जपळपास आहेत. हे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर पुढील काही काळ दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या दराने मका निर्यातीसाठी हालचाली सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही मक्याचे दर सुधारले आहेत. ‘सीबॉट’वर मक्याचे दर ४६५ डॉलरवरून ५३० डॉलर प्रतिबुशेलवर गेले आहेत.  सोयाबीन दराला अनुकूल घटक 

  • अमेरिकेच्या कृषी विभागाने 
  • भारतीय सोयाबीनची निर्यात चांगली होण्याची शक्यता 
  • मागील हंगामातील सोयाबीनचा कमी साठा 
  • पाऊस, अतिवृष्टी आणि येलो मोझॅक रोगाने सोयाबीन उत्पादनात घट 
  • सोयामील प्लांट मालकांना मिळत असलेले चांगले मार्जिन 
  • सध्या बाजारात दर वाढतेच 
  • नवीन माल बाजारात येण्याला आणखी सात महिन्यांचा कालावधी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com