नांदेडमध्ये सोयाबीन ३७०० ते ४०२५ रुपये प्रतिक्विंटल

 soybeans are available at Rs 3700 to 4025  In Nanded
soybeans are available at Rs 3700 to 4025 In Nanded

नांदेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. २०) सोयाबीनची २००० क्विंटल आवक होती. त्यास प्रतिक्विंटल ३७०० ते ४०२५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहेत. गुरुवारी (ता. १९) सोयाबीनची ११३५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटलला किमान ३६०० ते कमाल ४ हजार ९० रुपये दर मिळाले. ज्वारीची १३ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला १४५० रुपये दर मिळाले. गव्हाची ८६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला किमान १ हजार ९३० ते कमाल २००० रुपये दर मिळाले. 

हळदीची ७३० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ५४०० ते ६७०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १५) सोयाबीनची १५७७ क्विंटल आवक झाली. त्यावेळी त्यास प्रतिक्विंटलला ३७०० ते ४१२५ रुपये दर मिळाले. ज्वारीची ६ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला १३५० ते १४५० रुपये दर मिळाले. हळदीची ७४२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ४८०० ते ६६०० रुपये दर मिळाले.

परभणीत कापसाला ४७०० ते ५१२५ रुपये

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १९) कापसाची ५०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४७०० ते ५१२५ रुपये दर मिळाले, अशी माहिती तेथील सूत्रांनी दिली.

हिंगोलीत हळदीला ५००० ते ६१६२ रुपये

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. २०) हळदीची १२०० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विटंलला ५००० ते ६१६२ रुपये दर मिळाले. सोयाबीनची १९८० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ३६०० ते ४१९० रुपये दर मिळाले. ज्वारीची १० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला १२०० ते ३००० रुपये दर मिळाले. गव्हाची ५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १७८० ते २५०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com